
BJP-Shivsena Shinde Group Mahayuti मुंबई: महापालिका निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) फटका बसू नये, यासाठी आता हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. भाजप (BJP) आणि शिवसेना शिंदे गट पक्षांतील (Shivsena Shinde Group) कटुता संपवण्यासाठी दिल्लीतील शिर्षस्थ नेतृत्व मध्यस्थी करणार अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती समोर आली आहे.
नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गट या दोन्ही पक्षांतील वाद विकोपाला पोहोचला आहे. प्रचारसभादरम्यान, दोन्ही पक्षांमधील नेत्यांचे वाद आणि संघर्ष चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले.अशात, महापालिकेत फटका बसू नये म्हणून दिल्लीतील नेते मध्यस्थी करणार आहेत.
प्रचारादरम्यान भांडून झाल्यानंतर मैत्रीची आठवण कशी झाली? (Shivsena Shinde Vs BJP)
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला नगरपलिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गट या दोन्ही पक्षांनी प्रचारात एकमेकांचे हवे तेवढे लचके तोडले. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. परंतु तेव्हाही मध्यस्थी झाल्याचं पाहायला मिळाली नाही. पण आज प्रचार संपत असताना शेवटच्या दिवशी दोन्ही पक्षातील कटुता संपवण्यासाठी दिल्लीतील शिर्षस्थ नेतृत्व करणार असल्याची माहिती महायुतीमधील नेते देत असल्यामुळे प्रचारादरम्यान भांडून झाल्यानंतर मैत्रीची आठवण कशी झाली? असा प्रश्न समोर येत आहे.
संबंधित बातमी:
आणखी वाचा