महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था मधील कंत्राटी कामगारांसाठी ऐतिहासिक विजय!
➡️ हजारो कंत्राटी कामगारांच्या संघर्षाला अखेर यश!
➡️ महापालिकेतील कामगारांना १५ ते २० हजार रुपयांची थेट वेतनवाढ!
➡️ अंतिम टप्प्यातील निर्णय – येत्या दोन महिन्यांत अंमलबजावणी निश्चित!
महाराष्ट्रातील कंत्राटी कामगारांसाठी ही मोठी सुवर्णसंधी आहे. अनेक वर्षांपासून प्रतीक्षित असलेल्या वेतनवाढीचा ऐतिहासिक निर्णय अखेर प्रत्यक्षात येणार आहे. महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या सातत्यपूर्ण लढ्यानंतर आणि महापालिका कंत्राटी विभागाचे अध्यक्ष मा. संजय सुतार यांच्या अथक प्रयत्नांमुळे किमान वेतनवाढीचा निर्णय अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.
कामगारांच्या वेतनात ऐतिहासिक वाढ!
राज्यातील हजारो कंत्राटी कामगारांना १५,००० ते २०,००० रुपयांची वेतनवाढ मिळणार असून, ही आतापर्यंतची सर्वात मोठी वेतनवाढ ठरणार आहे. यामुळे कामगारांचे जीवनमान सुधारेल आणि त्यांच्या कुटुंबांचे भविष्य अधिक सुरक्षित होईल.
शासनाच्या पातळीवर अंतिम निर्णय लवकरच!
✔️ किमान वेतन वाढीचा मसुदा तयार – लवकरच शासनाकडून अंतिम निर्णय होणार!
✔️ कामगार हक्कांसाठीच्या लढ्याला यश – महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या प्रयत्नांना मोठे फळ!
✔️ राज्यभरातील हजारो कंत्राटी कामगारांना थेट लाभ!
कामगारांच्या हक्कांचा ऐतिहासिक विजय!
कामगारांच्या न्यायासाठी महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे कंत्राटी विभाग अध्यक्ष संजय सुतार यांनी दिलेल्या लढ्याला अखेर यश मिळाले आहे. हा संघर्ष राज्यातील सर्व कंत्राटी कामगारांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरेल.