
Maharashtra Weather Update : उत्तर भारतात थंडीचा जोर वाढल्यानं संपूर्ण महाराष्ट्रसह बहुतांश जिल्ह्यात थंडीची लाट (Temperature Down) पसरली आहे. तर पूर्व विदर्भातील भंडार, गोंदियासह यवतमाळसाठी हवामान विभागाने थंडीचा येलो अलर्ट जारी केला आहे. परिणामी हुडहुडी भरणाऱ्या थंडीनं भंडारा जिल्हा अक्षरशः गारठला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सध्या थंडी जाणवत असून काही ठिकाणी पारा दहा अशांच्याही खाली घसरला आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा थोडी लवकरच आलेली थंडी मात्र उद्यापासून (बुधवार) कमी होणार असल्याचा अंदाज आहे. त्याऐवजी आता हवामानात होणाऱ्या बदलामुळे 22 नोव्हेंबरनंतर दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
Maharashtra Weather Update : 22 नोव्हेंबरनंतर हलक्या पावसाच्या सरी?
भारतासह राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. अशातच मुंबईसह मुंबईउपनगराच्या किमान तापमानातेही बदल जाणवू लागला आहे. हिमालयात झालेली बर्फवृष्टी, उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारे थंड वारे इत्यादी कारणांमुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यभरातील किमान तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. तर आगामी काळात मुंबईतील पारा 18 वरून 22 अंश सेल्सिअसदरम्यान नोंदविण्यात येणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे मुंबईतला गारवाही गेल्या काही दिवसांच्या तुलनेत कमी होण्याचा अंदाज आहे.
Bhandara Weather Update पूर्व विदर्भाला हवामान विभागाचा थंडीचा येलो अलर्ट
उत्तर भारतात थंडीचा जोर वाढल्यानं संपूर्ण महाराष्ट्रसह भंडारा जिल्ह्यातही हुडहुडी भरणाऱ्या थंडीनं भंडारा जिल्हा गारठला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सध्या थंडी जाणवत असून काही ठिकाणी पारा दहा अशांच्याही खाली घसरला आहे. पुढच्या काही दिवसांत मध्य भारतात थंडीची लाट कायम राहण्याचा अंदाज असून महाराष्ट्रातही अनेक जिल्ह्यांसह भंडारा जिल्ह्याला यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. भंडारा जिल्ह्यात मागील काही दिवसात थंडीचा जोर वाढल्याचं जाणवू लागलं आहे.
वाढत्या थंडीमुळं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. भंडारा जिल्ह्याचाही तापमान 10 अंश सेल्सिअसवर पोहोचल्यानं या हुडहुडी भरणाऱ्या थंडीतही भंडाराकर अगदी सकाळपासूनच मॉर्निंग वॉकला निघत असल्याचं चित्र बघायला मिळत आहे. आहिल्यानगर, जळगाव, नाशिक, यवतमाळ, पुणे, मालेगाव, महाबळेश्वर, भंडारा, अमरातवी, नागपूर, वाशिम, गोदिंया येथील पारा 11अंशांपेक्षाही खाली गेला.
महत्वाच्या बातम्या:
आणखी वाचा