Mumbai Fire : मुंबईच्या दहिसर पश्चिम गणपत पाटील नगर परिसरामध्ये मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. संध्याकाळी पाचच्या सुमारास गणपत पाटील नगर गल्ली नंबर सातमध्ये झोपड्यात ही मोठी आग लागली आहे. मोठ्या प्रमाणात आजूबाजूला झोपडपट्टी असल्यामुळं आग आजूबाजूला पसरली आहे.
आगीचा माहिती मिळतच अग्निशामक दलाच्या चार ते पाच गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार सुदैवाने या आगीमध्ये आतापर्यंत कोणतेही जीवित हानी झालेली नसून मात्र या आगीत मोठ्या प्रमाणात घरे जळून खाक झाले आहेत. आग कशामुळे लागली या संदर्भात अग्निशमन दलाचे जवान आणि एम.एच.बी पोलीस अधिक तपास करत आहेत.
आणखी वाचा