
Mangalprabhat Lodha Dadar Kabutar Khana मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देशानुसार मुंबईतील कबूतरखान्यावर (Kabutar Khana) कारवाई करण्यात येत आहे. मुंबई महापालिकेने नुकत्याच जारी केलेल्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना अन्न घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार कबूतर खाणे मुंबई शहरात बंद करण्यात आलेले आहेत. मात्र याला काही लोकांकडून विरोध केला जातोय. मुंबईत कबूतरखाने सुरू राहावेत यासाठी जैन समाजाने रॅली देखील काढली. तसेच मंत्री आणि भाजपचे नेते मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी देखील नागरिकांच्या मागणीची दखल घेण्याची विनंती केली आहे. त्यानंतर आज पुन्हा मंगलप्रभात लोढा यांनी माध्यमांशी संवाद साधत न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागतचं आहे. लोकांना आरोग्याचा त्रास नको. पण कबुतर मरु द्यायचे नाही ही आपली पण जबाबदारी आहे, अशात आपल्याला मधला मार्ग काढावा लागेल, असं मंगलप्रभात लोढा म्हणाले.
काल मी नॅशनल पार्कमध्ये कबुतरखान्याचे भूमिपूजन केले आहे. तिथे कोणीही राहात नाही. तिथे दोन-तीन दिवसांत कबुतरखाना तयार होईल. आम्ही यासंदर्भात आयुक्तांना पत्र लिहितोय, मोकळ्या जागा अनेक ठिकाणी आहेत. आरे कॉलनी, रेसकोर्स, नॅशनल पार्क आहे. त्याच पार्श्वभूमीवर ओपन स्पेस विकसित करण्याची आवश्यकता आहे. कबुतराचे देखील वैशिष्ट्य आहेत, ते नॉनव्हेज घेत नाही, कचरा आणि इतर काही खात नाही, असं मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. लोकांचे आरोग्य देखील महत्वाचे आहे. न्यायालयाचे निर्णयाचे स्वागत आहे. पण आपल्याला मधला मार्ग काढावा लागेल. मी यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांची भेटही घेणार आहे, अशी माहिती मंगलप्रभात लोढा यांनी दिलीय.
आहाराअभावी कबूतरांचा रस्त्यांवर मृत्यू-
मुंबईत कबूतरांना आहार देण्यावर निर्बंध लावण्यात आल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीची दखल घेत राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहून पक्षीप्रेमी, साधू-संत व नागरिकांनी व्यक्त केलेल्या भावना लक्षात घेण्याची विनंती केली आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा मान ठेवत सुवर्ण मध्य काढण्याचे आवाहन त्यांनी पत्राद्वारे केले. लोढा यांनी पत्रात नमूद केले आहे की, आहाराअभावी कबूतरांचा रस्त्यांवर मृत्यू होत असून त्यामुळे नवीन सार्वजनिक आरोग्यविषयक समस्या उद्भवत आहेत. याबाबत महापालिकेने व्यापक आणि संतुलित दृष्टिकोन ठेवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
मंत्री लोढा यांनी पत्राद्वारे पुढील सूचना मांडल्या-
– कबूतरांना आहार देण्यासाठी पर्यायी उपाययोजना राबवाव्यात.
– बीकेसी, रेसकोर्स, आरे कॉलनी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यांसारख्या मोकळ्या जागांना सुरक्षित व नियंत्रित आहार क्षेत्र म्हणून निश्चित करण्याचा विचार करावा.
– दीर्घकाळ चालत आलेल्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरांचा आदर राखून निर्णय घ्यावा.
– जनभावनेची दखल घेत, सार्वजनिक आरोग्य आणि पशुप्रेम यामधील संतुलन साधणारा सुवर्णमध्य काढावा.
दादरचा कबूतरखाना ताडपत्री लावून बंद, VIDEO:
संबंधित बातमी:
आणखी वाचा