Headlines

Manikrao Kokate and Ajit Pawar: राजीनाम्याचा निर्णय झाला? अजितदादांच्या चेंबरमधून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची देहबोली सगळं सांगून गेली, नेमकं काय घडलं?

Manikrao Kokate and Ajit Pawar: राजीनाम्याचा निर्णय झाला? अजितदादांच्या चेंबरमधून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची देहबोली सगळं सांगून गेली, नेमकं काय घडलं?
Manikrao Kokate and Ajit Pawar: राजीनाम्याचा निर्णय झाला? अजितदादांच्या चेंबरमधून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची देहबोली सगळं सांगून गेली, नेमकं काय घडलं?


Manikrao Kokate and Ajit Pawar: सातत्याने वाढ ओढावून घेण्याची ‘साडेसाती’ मागे लागलेले राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली. अधिवेशनकाळात सभागृहात ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) टीकेच्या भोवऱ्यात सापडले होते. यानंतर माणिकराव कोकाटे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले होते. मात्र, त्याच पत्रकार परिषदेत माणिकरावांनी ‘शासनाला भिकारी’ म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाराजी ओढावून घेतली होती. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांची कृषीमंत्रिपदावरुन उचलबांगडी होण्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर माणिकराव कोकाटे यांनी आज अजित पवार यांची भेट घेतली. या बैठकीनंतर अजित पवारांच्या दालनात प्री-कॅबिनेट बैठक झाली. ही बैठक संपल्यावर माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर नेत्यांपाठोपाठ बाहेर पडले. त्यावेळी माणिकराव कोकाटे यांची देहबोली बरेच काही सांगून गेली. आजच्या बैठकीत अजित पवारांनी नेहमीप्रमाणे अभय दिले नाही, असेच संकेत कोकाटेंच्या देहबोलीवरुन मिळत होते.

एरवी माणिकराव कोकाटे हे बिनधास्तपणे प्रसारमाध्यमांशी बोलतात. मात्र, आज अजित पवार यांच्या केबिनमधून बाहेर पडल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलणे पूर्णपणे टाळले. माध्यमांना टाळत माणिकराव कोकाटे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला निघून गेले. माणिकराव कोकाटे यांची ही शांतता वेगळ्याच गोष्टीचे द्योतक असल्याचे सांगितले जात आहे.  आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या बैठकीनंतर अजित पवार माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत काय निर्णय घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

Manikrao Kokate: मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी अजित पवारांच्या अँटी चेंबरमध्ये काय घडले?

आज माणिकराव कोकाटे आपल्या मुलीसह मंत्रालयात आले होते. त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अँटी चेंबरमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली. अँटी चेंबरमध्ये झालेल्या चर्चेवेळी अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांना खडेबोल सुनावले. कोकाटे, तुमच्यामुळे सरकारची बदनामी होत आहे. बोलताना आपण भान ठेवायला हवं, असे अजित पवार यांनी कोकाटे यांना म्हटल्याचे समजते. यानंतर माणिकराव कोकाटे यांनी झाल्या प्रकाराबद्दल अजित पवार यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली. पुढील काळात अशा बाबी घडणार, असे आश्वासनही दिले. 

आणखी वाचा

कितीदा चुकणार, कितीदा माफ करणार? अजित पवारांचा माणिकराव कोकाटेंच्या कट्टर समर्थकांना रोखठोक सवाल

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *