
Devendra Fadnavis And Sunil Tatkare On Manikrao Kokate: कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या राजीनाम्यावरुन सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. मात्र माणिकराव कोकाटे प्रकरणी खांदेपालटाचा पर्याय चर्चेत आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांची एका बैठकीत चर्चा झाली. याबाबत काय निर्णय होणार, हे आगामी दिवसांत स्पष्ट होईल.
माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावर काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इजा झाला, बिजा झाला म्हणत कारवाईचे संकेत दिले होते. रमीच्या वादावर माणिकराव कोकाटेंशी बोलून येत्या सोमवारी किंवा मंगळवारी निर्णय घेणार असल्याचं अजित पवारांनी काल माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आता एक महत्वाची माहिती आली आहे.
देवेंद्र फडणवीस आणि सुनील तटकरेंच्या बैठकीत काय ठरलं? (Devendra Fadnavis And Sunil Tatkare On Manikrao Kokate)
माणिकराव कोकाटे प्रकरणी खांदेपालटाचा पर्याय वापरला जाईल. मंत्रिपद जाण्यापेक्षा बदल सोयीस्कर, असल्याची चर्चा देवेंद्र फडणवीस आणि सुनील तटकरे यांच्या बैठकीत झाल्याची सूत्रांची माहिती आहे. माणिकराव कोकाटे यांनी काहीही सांगितले तरी सरकारसाठी ते भूषणावह नाही अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही या प्रकरणी उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर कोकाटे यांचे मंत्रिपद काढून घेण्याची चर्चा सुरू झाली. परंतु रमीची जाहीरात आली होती, ती मी स्कीप करत होतो. आपण काहीही चुकीचं केल नाही असं माणिकराव कोकाटे म्हणाले होते.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
मला कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याशी समोरासमोर बोलायचं आहे. ते भिकारी म्हणाले, याबाबत देखील मी त्यांच्याशी बोलणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आम्ही एकत्रित निर्णय घेऊ, असं अजित पवारांनी सांगितले. तसेच प्रत्येकाने भान ठेवून वागलं पाहिजे, बोललं पाहिजे, हेच माझं सांगणं आहे. मागे एकदा कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून असंच घडलं होतं, तेव्हाही मी त्यांना समज दिली होती. इजा झालं, बिजा झालं आता तिसऱ्यांदा अशी वेळ आणू नका असं मी माणिकराव कोकाटेंना सांगितलं आहे.माझी त्यांची आता जेव्हा केव्हा भेट होईल तेव्हा मी काय कारवाई करायची ते बघेन, असं अजित पवार म्हणाले.
संबंधित बातमी:
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांचं रोखठोक भाष्य, म्हणाले, इजा झालं, बिजा झालं, आता…..
आणखी वाचा