Headlines

Manoj Jarange: तू भंडारा लाव नाही तर …मनोज जरांगे पाटलांनी धनंजय मुंडे समर्थकांना घेतले शिंगावर, दिला तो थेट इशारा, वाद पेटणार?

Manoj Jarange: तू भंडारा लाव नाही तर …मनोज जरांगे पाटलांनी धनंजय मुंडे समर्थकांना घेतले शिंगावर, दिला तो थेट इशारा, वाद पेटणार?
Manoj Jarange: तू भंडारा लाव नाही तर …मनोज जरांगे पाटलांनी धनंजय मुंडे समर्थकांना घेतले शिंगावर, दिला तो थेट इशारा, वाद पेटणार?


मनोज जरांगे पाटील, धनंजय मुंडेImage Credit source: टीव्ही ९ मराठी

Manoj Jarange on Dhananjay Munde Supporters Govind Fad: धनुभाऊंचे समर्थक आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे समर्थक गोविंद फड यांनी गेल्या आठवड्यात जरांगे पाटील यांना धमकी दिली होती. आम्ही भाळी भंडारा लावल्याचे थेट इशारा त्यांनी दिला होता. आता वक्तव्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी फड यांना थेट उत्तर दिले आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे एका कार्यक्रमासाठी ते आले होते. त्यावेळी त्यांनी मुंडेंसह फड यांच्यावर निशाणा साधला.

तू भंडारा लाव किंवा गुलाल…

मी माझ्या समाजाला देव मायबाप मानलं आहे. माझी संपत्ती तुम्ही आहे मी आयुष्यात एक रुपया कमविला नाही, माझे मायबाप तुम्ही आहात.मी पण डावावर लागलो. माझे कुटुंब पण डावावर लागलंय. कधी मारून टाकतील मला आणि माझ्या कुटूंबाला तरी मी हटत नाही. मी रात्रंदिवस बाहेर आहे. कोणाला यायचे त्याला येऊ द्या आम्ही समर्थ आहे लढायला मराठे तू कोणत्याही गावात ये राज्यातल्या प्रत्येक गावात माझा मराठा आहे.

फक्त तू ये. धमक्या देऊ नको. यावं करणार आहे त्याव करणार, या धमक्या नको देऊ. काल कुणीतरी म्हणालं, ते धनंजय मुंडे याचं कुणीतरी ते म्हणाले भंडारा लावून मारून टाकतो. तू भंडारा लाव नाहीतर गुलाल काहीही लाव. मी मरायला भीत नाही. माझी कधीपण तयारी आहे. माझा समाज पण सज्ज आहे, असा इशारा त्यांनी फड यांना दिला. का मारायचं तर गरिबांच काम करतो हेच कारण ना. समाजाने एकजुटीने रहा खूप मोठ्या संघर्षाला सामोरे जायचे आहे, असे आवाहन त्यांनी केले.

ज्या क्षेत्रात अडचणी आहेत त्या क्षेत्रात सुध्दा मी एक यंत्रणा उभा करायला लागलोय. मी समाजाला सांगितलेले आहे चार पाच दिवसानंतर राज्यभरातील एक वर्षासाठी दौरे पूर्णपणे बंद करणार आहे. तुम्हाला आरक्षण दिलंय चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत टेंशन नाही, तुम्हाला आयुष्यभरासाठी एक यंत्रणा उभी करतोय. महाराष्ट्रातील कोणत्याही कोनाकोपर्‍यात अडचण आली तर 15 मिनिटात माणूस तुमच्या मदतीला आला पाहिजे.

शेतकर्‍यांचं कर्ज माफ करतो

मी एकदा मुद्दा घेतला की आपण एकदा माग लागलो की पाणी काढूस्तोवर माग सरकत नाही मग जे व्हायचं असतो असू दे. शेतकरी म्हणून आंदोलनात उतरा. शेतकर्‍यांनी सुध्दा पुढं आलं पाहिजे. शेतकऱ्यांमध्ये गटतट नसले पाहिजेत, तरच त्यांना न्याय मिळेल. तुमचं कर्ज ठेवत नाही. या पवित्र व्यासपीठावरुन आजच शब्द देतो, तुमचं कर्ज ठेवत नाही, तुमच्या मालाला भाव कसा मिळत नाही ते बघतो तुमच्या पीक विम्याचे पैसे कसे काय मिळत नाही ते बघतो, तुमच्या दुधाला कसा भाव मिळत नाही ते पण आपल्याकडे लागलं तुम्ही फक्त टेंशन नाही घ्यायचे.

फक्त चल म्हणलं की एकदा बस म्हणलं की उठायचं नाही. लढाई जिंकायची म्हटलं तर ती चिकाटीने लढायची असते. आपण चिकाटीने लढलो म्हणून 58 लाख नोंदी निघाल्या अडीच ते तीन कोटी मराठे आरक्षणात गेलेत तुम्हाला काय बोंबलायचे ते बोंबलू द्या. कुणी उठत आणि माझ्या मागे लागतात दोन चार दिवसाला चार पाच जण उठले की आले मीडियात आणि तेवढाच आरोप आहे दुसरं काही नाही असा आरोप त्यांनी विरोधकांवर केला.

या गाड्या माझ्या नाहीत मराठा समाजाच्या आहेत. चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत टिकणार आरक्षण द्यायचं तात्पुरत मागायचं नाही. लाडक्या बहि‍णीला पंधराशे दिले होते पुरले का नाही मग कशाला घेतले असं सरकार नादी लावतं. लाडक्या बहिणीला पंधराशे देतात आणि बाजाराला जाईपर्यंत उडतात आणि ते जर दाजीच्या सपाट्यात सापडले तर उडाले, असा इशारा त्यांनी दिला. आता आपण पोरींना मोफत शिक्षण करून घेतले आहे आपण फ़क्त मराठ्यांसाठी देत होते तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो.

सगेसोयऱ्याचा विषय लवकरच निकाली

ज्यावेळेस आपण पहिल्यांदा मोर्चा घेऊन गेलो होतो वाशीला तिथे सांगितले सग्यासोयऱ्यांची अधिसूचना काढली. आता हरकतीची छाननी करेपर्यंत तीन चार महिने लागणार आहेत तोपर्यंत आपण मराठ्यांच्या पोरींना मोफत शिक्षण करू. मी जर जातीवादी असतो ना तर हो फक्त मराठ्याच्याच पोरीला मोफत शिक्षण हवे अशी मागणी केली असती. मी त्यावेळी सांगितले सगळ्या जातीच्या लेकीबाळीना मोफत शिक्षण करा आणि तो जी आर मंजूर करून घेतला. आता आरक्षणाचा पश्चिम महाराष्ट्राचा नंबर आहे मला वाटतंय 7 तारखेपर्यत काय तरी खालीवर करतील, नाही केलं तर मी त्यांच्या मागे लागणार आहे सांगितले आहे

महाराष्ट्राला कुटुंब मानलं आहे. सगळ्या राज्यातला समाज मायबाप आहे माझा मी सगळ्यासाठी लढणार आहे.फक्त जरा दमानी जाऊ.खोट्या प्रतिष्ठेत जगायचं सोडून द्या. सत्य काय आहे त्याची जाणीव करून घ्या.मी समाजाच्या लेकरा बाळासाठी झिजलो आहे की शत्रू सुद्धा झाले आहेत. माझ्या डायरेक्ट सुपाऱ्या देतात. माझ्या घातपाताच्या त्याला माहिती नाही त्याला, मी सुपारी फोडीन त्यांची.माझ्या दारात आलेला माणूस कोणत्याही जातीचा असू द्या मी परत पाठवीत नाही. उदाहरण म्हणून सांगतो महादेव मुंडे यांचे कुटुंब मी माघारी पाठवले असते आता आरोपी जेलमध्ये टाकायची वेळ आली आहे. नार्को टेस्ट पर्यंत प्रकरण नेले. ते प्रकरण पूर्ण दाबले होते. मी कुठे जातिवाद केला. अंतरावलीच्या दारात आलेला माणूस कधीही मी परत पाठवलेला नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *