Headlines

MCA Election : ठाकरेंचे आमदार मिलिंद नार्वेकर मुंबई क्रिकेटच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत; शरद पवारांना फोन, जय शाहांची मदत हवी

MCA Election : ठाकरेंचे आमदार मिलिंद नार्वेकर मुंबई क्रिकेटच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत; शरद पवारांना फोन, जय शाहांची मदत हवी
MCA Election : ठाकरेंचे आमदार मिलिंद नार्वेकर मुंबई क्रिकेटच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत; शरद पवारांना फोन, जय शाहांची मदत हवी



Mumbai Cricket Association Election : मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत आता चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. विद्यमान अध्यक्ष अजिंक्य नाईक (Ajinkya Naik) हे पुन्हा एकदा अध्यक्षपदाच्या शर्यतीत असून ठाकरेंचे आमदार मिलिंद नार्वेकरही (Milind Narvkar) अध्यक्षपदासाठी आग्रही आहेत. मिलिंद नार्वेकरांनी यासाठी जय शाह यांची मदत हवी असल्याची माहिती आहे. मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी 12 नोव्हेंबर रोजी निवडणूक होत असून या पदासाठी सहा जण इच्छुक असल्याची माहिती आहे.

मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदासाठी त्रैवार्षिक निवडणूक होत आहे. त्यासाठी विद्यमान अध्यक्ष अजिंक्य नाईक, ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर, भाजपचे नेते प्रसाद लाड, जितेंद्र आव्हाड, विहंग सरनाईक इच्छुक आहेत. त्याचसोबत माजी कर्णधार डायना एडुलजी या सुद्धा अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत.

MCA Election : मिलिंद नार्वेकरांच्या भेटीगाठी सुरू

ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर हे एमसीएच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक असून त्यांनी भेटीगाठी सुरू केल्याचं दिसतंय. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. तर उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकरांसाठी शरद पवारांनाही फोन लावल्याची माहिती आहे. मिलिंद नार्वेकर यांनी एमसीए अध्यक्षपद, उपाध्यक्ष पद, सेक्रेटरी, खजिनदार, जॉईंट सेक्रेटरी एकूण सहा पदासाठी अर्ज भरले आहेत.

मिलिंद नार्वेकरांना या निवडणुकीत जय शाह यांच्या मदतीची अपेक्षा आहे. त्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे विद्यमान अध्यक्ष अजिंक्य नाईक हे देखील शर्यतीत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत शरद पवार आणि जय शाह यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळेच मिलिंद नार्वेकरांसाठी उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना फोन लावल्याची माहिती आहे.

एमसीएची त्रैवार्षिक निवडणूक 12 नोव्हेंबर रोजी होणार असून अर्ज माघार घेण्यासाठी 9 नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *