Mega Block Local : मुंबईत आज मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर ब्लॉक

Mega Block Local : मुंबईत आज मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर ब्लॉक
Mega Block Local : मुंबईत आज मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर ब्लॉक


मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज मुंबईतील मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि इतर तांत्रिक कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येत आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावरील मेगाब्लॉक सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत सांताक्रुझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान असणार आहे. या वेळेत पश्चिम रेल्वेच्या धीम्या मार्गावरील काही गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येतील.

त्याचप्रमाणे, मध्य रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते विद्याविहार स्थानकांदरम्यान सकाळी 10 वाजून 55 मिनिटांपासून सायंकाळी 3 वाजून 55 मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक असेल. मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील काही गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. हार्बर मार्गावरही ब्लॉक असणार आहे, ज्यामुळे तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा काही प्रमाणात विस्कळीत होण्याची शक्यता आहे. प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना या मेगाब्लॉकची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *