
मुंबई इंडियन्सचा स्टार बॅट्समन रोहित शर्मा याने आयपीएल स्पर्धेतील 18 व्या मोसमात धमाकेदार सुरुवात केली. रोहितने केकेआर विरुद्ध 38 बॉलमध्ये 78 रन्स केल्या. रोहितने या दरम्यान 6 चौकार आणि 6 षटकार लगावले. रोहितने या दरम्यान अवघ्या 23 चेंडूत अर्धशतक झळकावलं. रोहितचं हे आयपीएल कारकीर्दीतील सर्वात वेगवान अर्धशतक ठरलं. रोहितने या दरम्यान अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. (Photo Credit : PTI)
रोहितने या दरम्यान 3 षटकार लगावून मोठा विक्रम आपल्या नावावर केला. रोहितने टी 20 कारकीर्दीत 550 षटकार पूर्ण केले. रोहित यासह टी 20 किकेटमध्ये 550 सिक्स पूर्ण करणारा पहिला आशियाई आणि एकूण नववा फलंदाज ठरला. (Photo Credit : PTI)
रोहितने या दरम्यान केकेआर विरुद्ध 1 हजार 100 धावा पूर्ण केल्या. रोहित यासह केकेआर विरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. याआधी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नर याच्या नावावर होता. (Photo Credit : PTI)
रोहितचं केकेआर विरुद्धचं अर्धशतक हे त्याच्या कारीकीर्दीतील एकूण 50 वं अर्धशतक ठरलं. रोहित अशी कामगिरी करणारा एकूण चौथा फलंदाज ठरला. तसेच रोहित अर्धशतकांचं अर्धशतक करणारा विराट कोहली याच्यानंतरचा पहिलाच फलंदाज ठरला. (Photo Credit : PTI)
रोहितने केकेआर विरुद्ध पावर प्लेमध्येच अर्धशतक पूर्ण केलं. रोहितची आयपीएलमध्ये पावरप्लेमध्ये 50 धावा करण्याची ही पहिलीच वेळ ठरली. (Photo Credit : PTI)