
हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात विजयी सुरुवात केली आहे. मुंबईने कोलकाता नाईट रायडर्सवर 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. कोलकाताने मुंबईसमोर 221 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मुंबईने हे आव्हान 5 बॉलआधी पूर्ण केलं. मुंबईने 19.1 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 222 धावा केल्या. मुंबईने अशाप्रकारे आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली. तर केकेआर अपयशी ठरली. रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन ही जोडी मुंबईच्या विजयाची शिल्पकार ठरली. तर इतरांनीही योगदान दिलं.
केकेआरची बॅटिंग
मुंबईच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार हार्दिक पंड्याने याने केकेआरला बॅटिंगसाठी बोलावलं. केकेआरसाठी लोकल बॉय असलेल्या 2 फलंदाजांनी धमाका केला. कर्णधार अजिंक्य रहाणे आणि अंगकृष रघुवंशी या दोघांनी अर्धशतक झळकावलं. तर फिन एलन आणि याने निर्णायक योगदान दिलं. तसेच अखेरच्या क्षणी उपकर्णधार रिंकू सिंह याने फिनिशिंग टच दिला. अजिंक्यने 67 आणि फिनने 37 धावांची खेळी केली. कॅमरुन ग्रीन 18 धावा करुन माघारी परतला. अंगकृषने 51 धावा जोडल्या. तर रिंकूने 33 आणि रमनदीप सिंह याने 4 धावा केल्या. केकेआरने अशापक्रारे 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 220 धावा केल्या. तर मुंबईसाठी लोकल बॉय शार्दूल ठाकुर याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या.
रोहित-रायनची कडक ओपनिंग
त्यानंतर रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन या सलामी जोडीने शतकी भागीदारी करुन मुंबईला अप्रतिम सुरुवात करुन दिली. या जोडीनेच मुंबईचा विजय निश्चित केला. या दोघांनी 11.5 ओव्हरमध्ये 148 रन्सी पार्टनरशीप केली. मुंबईने रोहितच्या रुपात पहिली विकेट गमावली. रोहितने 78 धावा केल्या. रायन रिकेल्टन याने सर्वाधिक 81 धावा जोडल्या. सूर्याने 16 आणि तिलक वर्मा याने 20 धावांचं योगदान दिलं. तर कॅप्टन हार्दिक पंड्या आणि नमन धीर या जोडीने मुंबईला विजयापर्यंत पोहचवलं. नमनने 5 आणि हार्दिकने 18 धावा केल्या.
मुंबईचा सर्वात मोठा विजय
या विजयासह कितीही मोठं आव्हान असोत मुंबई ते पूर्ण करतेच हे पलटणने दाखवून दिलं. मुंबईने यााआधी 219 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. तसेच मुंबई 2012 नंतर पहिल्यांदाच आयपीएल स्पर्धेत आपला पहिला सामना जिंकण्यात यशस्वी ठरली.
शार्दूल ठाकुर मॅन ऑफ द मॅच
दरम्यान घरच्याच मैदानात आणखी एक लोकल बॉय चमकला. शार्दुल ठाकुर याने 3 विकेट्स मिळवल्या. त्यासाठी शार्दुलचा सामनावीर पुरस्काराने सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे शार्दूलने मुंबईकडून पदार्पणातील सामन्यात ही कामगिरी करुन दाखवली.