Headlines

Middle East Update : अमेरिकेचा माज उतरला, आखाती देशांमधील धक्कादायक सत्य आलं बाहेर, जे वाटलं नव्हतं ते इराणने करुन दाखवलं

Middle East Update : अमेरिकेचा माज उतरला, आखाती देशांमधील धक्कादायक सत्य आलं बाहेर, जे वाटलं नव्हतं ते इराणने करुन दाखवलं
Middle East Update : अमेरिकेचा माज उतरला, आखाती देशांमधील धक्कादायक सत्य आलं बाहेर, जे वाटलं नव्हतं ते इराणने करुन दाखवलं


मध्य पूर्वेतील युद्धाने अमेरिकेला मोठा झटका दिला आहे. पश्चिम आशियातील शक्ती संतुलन पूर्णपणे बदलून गेलय. आखाती देशातील सैन्य तळ ही एकवेळ अमेरिकेची ताकद होती. त्यांचा प्रभाव दिसून यायचा. पण तेच बेस आता अमेरिकेची कमजोरी बनले आहेत. इराणने प्रत्युत्तराची कारवाई केली. त्यात सौदी अरेबिया, यूएई, कतर आणि बहरीन या देशातील अमेरिकन सैन्य बेसेसच मोठं नुकसान झालय. एक्सपर्ट्नुसार आखाती देशातील अमेरिकेच्या 12 सैन्य तळांचं इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालय की त्यांचा पुन्हा वापर करणं सुद्धा कठीण बनलय. आखातामधील अमेरिकी एअरबेस वापरण्यायोग्य राहिलेले नाहीत असं न्यूयॉर्क टाइम्सने वृत्त दिलं. ट्रम्प प्रशासनाने अजूनपर्यंत किती नुकसान झालय त्याची माहिती दिलेली नाही.

“आखातामधील तळ म्हणजे अमेरिकेची सैन्य ताकद होती. इराणने महिन्याभरात ही शक्तीच संपवून टाकली. खऱ्या नुकसानीचे फोटो अजून समोरच आलेले नाहीत” असं जॉर्ज वॉशिंगटन यूनिवर्सिटीतील मिडिल ईस्ट पॉलिटिक्स प्रोजेक्ट डायरेक्टरने म्हटलं आहे. आखातामध्ये सौदी अरेबिया, यूएई, कुवैत, कतर आणि बहरीन या देशांमध्ये हे बेस आहेत. तिथली माहिती आता बाहेर येऊ दिली जात नाहीय. युद्ध काळात या देशांनी आपल्या आकाशात मिसाइलचे फोटो, व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यावर बंदी घातली होती. त्यांना खरं चित्र लोकांपासून लपवायचं आहे का? असा प्रश्न आता विचारला जातोय.

आखाती देशांना संरक्षण मिळालं

बहरीनमध्ये अमेरिकन नौदलाचं पाचव्या फ्लीटचं मुख्यालय आहे. इराणने या मुख्यालयावर हल्ला केला. अमेरिकेच्या समुद्री शक्तीच हे केंद्र मानलं जायचं. 1990 च्या दशकात आखाती युद्धामध्ये अमेरिकेचं इथे सैन्य नेटवर्क मजबूत झालं. तेव्हापासून आतापर्यंत 19 मोठे सैन्य तळ या क्षेत्रात बनवण्यात आले. जवळपास 50000 सैनिक या भागात तैनात असतात. यामुळे आखाती देशांना संरक्षण मिळालं. त्या बदल्यात अमेरिकेला तेल आणि मध्य पूर्वेवर आपली पकड मजबूत करता आली.

पण आता हे समीकरण बदलताना दिसत आहे. जेव्हा अशा प्रकारच्या करारात एका पक्षाचा फायदा कमी आणि नुकसान जास्त होऊ लागतं तेव्हा ते नात कमकुवत व्हायला सुरुवात होते. युद्ध काळात आखाती देशांच्या एअर डिफेन्स सिस्टिमवर मोठा दबाव पडला. एअरपोर्ट, शाळा बंद कराव्या लागल्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *