
Raj Thackeray मिरा भाईंदर : मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून मिरा रोडमध्ये मराठी भाषकांचे आंदोलन यशस्वी झाल्यानंतर मनसेकडून (MNS) आता मोठं पाऊल टाकलं जाणार आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे आज स्वतः मिरा रोडला भेट देणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भव्य सभा आज (18 जुलै) मिरा रोड येथे होत आहे. या सभेची तयारी सध्या पूर्ण झाली आहे. मिरा रोडच्या नित्यानंदनगर येथील रस्त्यावर ही सभा होत आहे. येथून जवळ असलेली सेंट पॉल शाळेला अर्धा दिवसाची सुटुटी ही देण्यात आली आहे. तर या सभेसाठी 24 बाय 28 फुट एवढा स्टेज उभारण्यात आला आहे. याठिकाणी मनसेच्या शाखेचं उद्घाटन ही राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. ज्या ठिकाणी मनसेसैनिकांनी मराठी न बोलणा-या व्यापा-याला चोप दिला होता. ते जोधपूर स्वीट अॅण्ड फरसाण हे दुकान या सभेपासून अवघ्या 300 मिटर अंतरावर आहे. राज ठाकरे यांच याच दुकानासमोर प्रथम ढोल ताशांनी जंगी स्वागत केलं जाणार आहे. त्यानंतर ते सभेच्या ठिकाणी पोहचणार आहेत आणि येथे ही सभा होणार आहे.
राज ठाकरेंकडून आज मनसे सैनिकांना शाबासकीची थाप?
मनसे सैनिकांनी मराठीच्या मुद्द्यावरुन मिरा रोडमधील एका व्यापा-याला मारहाण केली होती. त्याच्या विरोधात मिरा भाईंदर मधील सर्व अमराठी व्यापा-यांनी 4 जुलैला आपली दुकाने बंद करुन, डीसीपी कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मनसेने ही 8 जुलै रोजी मराठी अस्मितेसाठी मोर्चा काढला होता. मात्र त्याला पोलिसांनी परवानगी न देता, मोर्चा अयशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला. आणि त्यामुळे त्यादिवशी मोठा गदारोळ झाला. मात्र शेवटी मोर्चा काढला गेला. 8 जुलैच्या या ऐतिहासिक मराठी मोर्चाला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शाबासकीची थाप देण्यासाठी मिरा रोडला येत आहे.
राज ठाकरे आज काय बोलणार? याकडे तमाम मराठी माणसांच लक्ष
दरम्यान, आजच्या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे तमाम मराठी माणसांच लक्ष लागलेलं आहे. कारण ज्या मीरा-भाईंदरमध्ये मराठी बोलणार नाही अशी मजुरी दाखवल्यानंतर पण मीरा-भाईंदरमध्ये चांगलाच वाद पेटला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसैनिकांनी दणका दिल्यानंतर अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता. मात्र मराठी मोर्चाला विरोध झाल्याने संतापाची लाट उसळली होती. आता या सर्व संतापविरोधात राज ठाकरे सुद्धा मीरा-भाईंदरमध्ये पोहोचणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून जो मुद्दा गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चिला जात आहे त्या मीरा भाईंदरमध्ये राज ठाकरे काय बोलणार? याची उत्सुकता आहे.
हे ही वाचा
आणखी वाचा