मीरा भाईंदरमध्ये मराठीच्या अस्मितेच्या मुद्द्यावर मनसे, ठाकरेंची शिवसेना आणि मराठी एकीकरण समितीच्या वतीने नुकताच काढण्यात आलेला मोर्चा यशस्वी झाला आहे. या मोर्चानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास मीरा भाईंदरमध्ये येणार आहेत. या भेटीदरम्यान, राज ठाकरे मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांशी संवाद साधतील. राज ठाकरे यांच्या मीरा भाईंदर भेटीच्या पार्श्वभूमीवर मनसेने ‘वाघ येतोय मीरा भाईंदर मध्ये’ या संकल्पनेवर आधारित प्रसिद्धी मोहीम सुरू केली आहे. या भेटीमुळे मीरा भाईंदरमधील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर झालेल्या या यशस्वी मोर्चानंतर राज ठाकरे यांच्या आगमनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.