
शरद त्रिपाठी : असं देखील म्हटलं जातं की, अभिनेत्रीने लेखक शरद त्रिपाठी याला देखील डेट केलं होतं. दोघांनी एका रिऍलिटी शोमध्ये देखील काम केलं. शोनंतर शरद आणि मृणाल यांचं ब्रेकअप झालं असं देखील समोर आलं.
बादशाह : 2023 मध्ये, मृणाल ठाकूर प्रसिद्ध रॅपर बादशाहला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. या बातम्यांनंतर बादशाहने स्पष्ट केलं की असे काहीही नव्हतं. त्यामुळे रंगणाऱ्या चर्चांना पूर्णविराम लागला.
सिद्धांत चतुर्वेदी : बॉलिवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी याच्यासोबत देखील मृणाल हिच्या नावाची चर्चा रंगली होती… दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला होता. एवढंच नाही तर, मृणाल आणि सिद्धांत यांना अनेकदा एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. पण दोघांनी देखील यावर कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.
कुशल टंडन: मृणाल ठाकूर हिचं प्रसिद्ध टीव्ही अभिनेता कुशल टंडनसोबत देखील प्रेमसंबंध असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तथापि, मृणालने या अफवांवर कधीही मौन सोडले नाही.
सुमंत : मृणाल ठाकूर आणि तेलुगू अभिनेता सुमंत यांच्या व्हायरल झालेल्या एका फोटोमुळे त्यांच्या डेटिंगच्या अफवा पसरल्या. दोघांपैकी कोणीही या नात्याला दुजोरा दिला नाही.
अर्जित तनेजा : या यादीत अर्जित तनेजा यांचं देखील नाव आहे. मृणाल ठाकूर हिचं अर्जित तनेजाशी प्रेमसंबंध होते असे म्हटले जाते. या नात्याचे सत्य आजपर्यंत समोर आलेले नाही.