Headlines

Mumbai 2006 Blast Case: 11 मिनिटांत 7 कुकर बॉम्बचा स्फोट, प्रेतांची रास रचली गेली, 'त्या' संध्याकाळी मुंबईत काय घडलं होतं?

Mumbai 2006 Blast Case: 11 मिनिटांत 7 कुकर बॉम्बचा स्फोट, प्रेतांची रास रचली गेली, 'त्या' संध्याकाळी मुंबईत काय घडलं होतं?
Mumbai 2006 Blast Case: 11 मिनिटांत 7 कुकर बॉम्बचा स्फोट, प्रेतांची रास रचली गेली, 'त्या' संध्याकाळी मुंबईत काय घडलं होतं?


Mumbai 2006 Blast Case: मुंबईत 11 जुलै 2006 रोजी लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी तब्बल 19 वर्षांनी मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai HC) निकाल सुनावला आहे. सोमवारी सुनावलेल्या या निकालात उच्च न्यायालयाने सर्व 11 आरोपींची निर्दोष मुक्तता केल्याने पोलीस आणि दहशतवादीविरोधी पथकाच्या तपासाला मोठा झटका बसल्याचे मानले जात आहे. या निकालाच्यानिमित्ताने पुन्हा एकदा 2006 सालच्या भीषण स्फोटाच्या (Mumbai 2006 Blast case) आठवणी जाग्या झाल्या आहेत. या स्फोटांच्या मालिकेत 209 जणांचा मृत्यू झाला होता. तर 800 पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. हा मुंबईच्या इतिहासातील काळा अध्याय ठरला होता.

11 जुलै 2006 च्या दिवशी मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावर माटुंगा ते मिरारोड या स्थानकांदरम्यान 11 मिनिटांत एकूण सात स्फोट झाले होते. पाकिस्तानच्या लष्कर-ए-तोयबा संघटनेने हे स्फोट घडवून आणले होते. या स्फोटांसाठी दहशतवाद्यांनी प्रेशर कुकर बॉम्बचा वापर केला होता. 11 जुलैला मुंबईकर नेहमीप्रमाणे आपापल्या कार्यालयांमधून घरी जाण्यासाठी निघाले होते. पश्चिम रेल्वेमार्गावरील लोकल ट्रेन्समध्ये नेहमीप्रमाणे गर्दी होती. सर्वात पहिला स्फोट 6 वाजून 24 मिनिटांनी झाला आणि शेवटचा स्फोट 6 वाजून 35 मिनिटांनी झाला. माटुंगा रोड, माहीम, वांद्रे, खार रोड, जोगेश्वरी, बोरिवली आणि मिरारोड या स्थानकांदरम्यान काही मिनिटांच्या अंतराने हे 7 स्फोट झाले होते.

हे स्फोट इतके शक्तिशाली होते की, ट्रेनच्या डब्याच्या अक्षरश: चिंधड्या झाल्या होत्या. पहिला स्फोट 6.24, दुसरा स्फोट 6.24, तिसरा स्फोट 6.25, चौथा स्फोट 6.26, पाचवा स्फोट 6.29, सहावा स्फोट 6.30 आणि सातवा स्फोट 6 वाजून 35 मिनिटांनी झाला होता. यापैकी तीन स्फोट वांद्रे-खार रोडदरम्यान, मिरारोड भायंदर आणि माटुंगा रोड- माहीम या स्थानकांदरम्यान झाले होते. तर तीन स्फोट हे लोकल ट्रेन माहीम, जोगेश्वरी आणि बोरिवली स्थानकातून निघताना झाले होते. सर्वाधिक मृत्यू हे माहीम येथील स्फोटात झाले होते. ही लोकल ट्रेन चर्चगेट ते बोरिवली अशी होती. या ट्रेनमधील 43 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.

या स्फोटांसाठी दहशतवाद्यांनी प्रेशर कुकर बॉम्बचा वापर केला होता. या बॉम्बमध्ये आरडीएक्स, अमोनियम नाईट्रेट, फ्यूएल ऑईल आणि खिळ्यांचा वापर करण्यात आला होता. दहशतवाद्यांनी वेगवेगळ्या लोकल ट्रेन्समध्ये हे प्रेशर कुकर बॉम्ब टाईमर सेट करुन ठेवून दिले होते. दहशतवादी हे बॉम्ब ट्रेनमध्ये ठेऊन खाली उतरले. त्यानंतर ठरलेल्या वेळी या बॉम्बचा स्फोट झाला होता. स्फोटानंतर ढिगाऱ्यात प्रेशर कुकरची हँडल्स मिळाली होती. त्यावरुन या सगळ्याचा उलगडा झाला होता.

Mumbai bomb blast: स्फोटानंतर रक्तामांसाचा सडा

अवघ्या 11 मिनिटांत झालेल्या या सात शक्तिशाली स्फोटांनी मुंबई हादरुन गेली होती. या स्फोटांनंतर मुंबईतील रेल्वे वाहतूक तात्काळ थांबवण्यात आली. त्यानंतर झालेल्या तपासणीत काही स्फोट न झालेले कुकर बॉम्ब मिळाले होते. या शक्तिशाली स्फोटांमुळे ट्रेनमध्ये बसलेल्या प्रवाशांच्या शरीराचे तुकडे झाले होते. या स्फोटांनंतर मुंबईतील सर्वच सरकारी रुग्णालयांमध्ये मोठ्या संख्येने जखमींना आणले जात होते. हे सर्व स्फोट हे लोकल ट्रेनच्या फर्स्ट क्लासच्या डब्यांमध्ये झाले होते. बहुतांश बॉम्ब हे चर्चगेटवरुन सुटणाऱ्या लोकल गाड्यांमध्ये ठेवण्यात आले होते. गुजरातमध्ये झालेल्या हिंसाचाराचा सूड म्हणून मुंबईतील गुजराती नागरिकांना लक्ष्य करण्यासाठी लष्कर-ए-तोयबाने हे स्फोट घडवून आणल्याची एक थिअरी तपासादरम्यान समोर आली होती.

आणखी वाचा

मुंबईत 2006 साली 11 मिनिटांत 7 स्फोट, 209 जणांचा मृत्यू; पण आज 12 आरोपींची निर्दोष सुटका, कोर्टात काय घडलं?

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *