
Mumbai Accident News : मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (Jogeshwari-Vikhroli Link Road) वर आज सकाळी पवई आयआयटीजवळ (IIT Powai) एक भीषण अपघात घडला. बेस्ट बसने दोन तरुणांना चिरडल्याची गंभीर घटना समोर आली असून यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला आहे, तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. (Mumbai Accident News)
मृत झालेल्या व्यक्तीचे नाव देवांश पटेल (वय 22, रा. जोगेश्वरी) असे असून, जखमी युवकाचे नाव स्वप्नील विश्वकर्मा (वय 22) असे आहे. स्वप्नील याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दोन्ही तरुण लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन परतत असताना अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.
पोलीस घटनास्थळी दाखल
अपघातानंतर घटनास्थळी पोलीस तातडीने दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे. पोलीस विभागाने या घटनेचा पंचनामा सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती, मात्र पोलिसांनी तत्परतेने ती सुरळीत केली. दरम्यान, ही घटना शहरातील वाढत्या अपघातांची आणि वाहतुकीची गंभीर समस्या अधोरेखित करत आहे. स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी या घटनेमुळे तीव्र नाराजी व्यक्त केली असून, रस्ते सुरक्षा उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
Nashik Accident : नाशिकच्या मुंबई नाका परिसरात बर्निंग कारचा थरार
दरम्यान, नाशिकच्या मुंबई नाका परिसरात गुरुवारी रात्री उशिरा एक थरारक घटना घडली. एका चालू असलेल्या कारला अचानक आग लागल्याने काही काळ परिसरात मोठी खळबळ उडाली. कारमधून अचानक धूर येऊ लागला. कारमधील दोन व्यक्तींनी सावधगिरी बाळगून कार थांबवली आणि तत्काळ बाहेर पडले. काही क्षणातच कारने पेट घेतला आणि आगीने रौद्ररूप धारण केले. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत कार पूर्णतः जळून खाक झाली असून, ती कशामुळे लागली हे स्पष्ट झालेले नाही. शॉर्टसर्किट किंवा इंधन गळतीमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
पंढरपूरला येणाऱ्या एसटी बस अन् ट्रकची धडक; भीषण अपघातात 16 प्रवासी जखमी, 6 जण गंभीर
हायवेलगतच्या टार्जन डान्सबारवर पोलिसांची मध्यरात्री धाड; दोन गुप्त केव्हेटीमधून 5 बारबालांची सुटका
आणखी वाचा