
Mumbai Accident News : मुंबईतील सह्याद्री राज्य अतिथीगृहाजवळ एका भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून निघाला. बेस्टच्या इलेक्ट्रिक बसने रस्त्यावर उभ्या असलेल्या कारला जोरदार धडक दिली. या जबरदस्त धडकेत बस आणि कारच्या मध्ये फसलेल्या एका पादचारी महिलेचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचे भयानक दृश्य पाहून परिसरातील लोकांच्या अंगावर शहारे उमटले. महिलेला तत्काळ जवळच्या जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
नेमकं काय घडलं?
बेस्टची इलेक्ट्रिक बस सह्याद्री अतिथीगृहासमोरुन जात असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्यालगत उभ्या असलेल्या एका कारवर जाऊन आदळली. या कारच्या शेजारी एक महिला उभी होती. इलेक्ट्रिक बस थेट तिच्या अंगावर आली आणि ही महिला कार आणि बसच्या मध्ये चिरडली गेली. दोन्ही वाहनांच्या मध्ये चिरडल्याने महिलेच्या शरीराचा खालचा भाग फिरल्याचे दिसत आहे. सदर महिला दक्षिण मुंबईतील रहिवासी असून ती मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
पुढील माहिती लवकरच…
आणखी वाचा