
Mumbai BDD Chawl new building rooms: दक्षिण मुंबईतील बहुचर्चित अशा बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून लवकरच येथील रहिवाशांना नवीन घरांचा ताबा मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे 3,000 रहिवाशांना नवीन आणि सुसज्ज घरे मिळणार आहेत. दक्षिण मुंबईतील (South Mumbai) अलिशान इमारतींना लाजवतील, अशी ही घरे आहेत. या घरांची छायाचित्रे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दक्षिण मुंबईतील जागांचे भाव गगनाला भिडले आहेत. 250 ते 300 चौरस फूट क्षेत्रफळाच्या घरासाठी (Homes in Mumbai) दक्षिण मुंबईत कोट्यवधी रुपये मोजावे लागतात. मात्र, बीडीडी पुनर्विकास प्रकल्पामुळे सामान्य आणि मध्यमवर्गीय मुंबईकरांना दक्षिण मुंबईत मोक्याच्या जागेवर अलिशान घरे मिळणार आहेत. या 47 मजली टोलेगंज इमारतींच्या अगदी वरच्या मजल्यांवरुन समोरच्या समुद्राचे विहंगम दृश्य (Sea view in Mumbai) पाहायला मिळत आहे. दक्षिण मुंबईत घरातून असा देखावा दिसणारे घर घ्यायचे झाल्यास दोन-तीन कोटीही कमी पडेल अशी परिस्थिती आहे. मात्र, आता सामान्य मराठी माणसांना या घरांमध्ये राहता येणार आहे. बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातंर्गत वरळी, नायगाव आणि अन्य परिसरातील जुन्या चाळींचे आधुनिक इमारतींमध्ये रूपांतर केले जात आहे.
Aaditya Thackeray: बीडीडी चाळीतील घरांचा ताबा देण्यासाठी आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
बी. डी. डी. चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पूर्ण झालेल्या घरांचा ताबा लाभार्थ्यांना द्यावा, असे पत्र आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळवू इच्छितो की, माझ्या मतदारसंघातील बी.डी.डी. चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या फेज १ अंतर्गत ५५६ घरे पूर्णतः तयार झालेली आहेत. ही घरे लॉटरीद्वारे निवड झालेल्या लाभार्थ्यांना देण्यासाठी सज्ज असून, लाभार्थ्यांना मनःपूर्वक वाटते की लवकरात लवकर चाव्यांचे वितरण झाले पाहिजे, जेणेकरून ते येणारा गणेशोत्सव आपल्या नवीन घरी साजरा करू शकतील. हे लाभार्थी अजून किती दिवस भाड्याच्या घरात किंवा ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहणार? या प्रकल्पांतर्गत नवीन घरे वितरित झाल्यानंतर ट्रान्झिट कॅम्प रिकामे होतील. त्यामुळे पुढील लाभार्थ्यांना तेथे स्थलांतर करता येईल आणि त्यामुळे संपूर्ण प्रकल्प लवकर पूर्ण होण्यास चालना मिळेल. येत्या आठवड्यात फेज १ अंतर्गत पूर्ण झालेल्या घरांचा ताबा लाभार्थ्यांना देण्यासाठी चावी वितरण कार्यक्रम आयोजित करावा, ही विनंती, असे आदित्य ठाकरे यांनी या पत्रात म्हटले आहे.
आणखी वाचा