Headlines

Mumbai BEST Election: बेस्ट सोसायटीच्या निवडणुकीला 24 तास शिल्लक अन् 21 संचालकांना EOW कडून चौकशीची नोटीस, मतदानापूर्वी मोठा ट्विस्ट

Mumbai BEST Election: बेस्ट सोसायटीच्या निवडणुकीला 24 तास शिल्लक अन् 21 संचालकांना EOW कडून चौकशीची नोटीस, मतदानापूर्वी मोठा ट्विस्ट
Mumbai BEST Election: बेस्ट सोसायटीच्या निवडणुकीला 24 तास शिल्लक अन् 21 संचालकांना EOW कडून चौकशीची नोटीस, मतदानापूर्वी मोठा ट्विस्ट


Mumbai BEST Election: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे एकत्र येण्याची चर्चा रंगत असतानाच, मुंबईतील ‘दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटी’च्या निवडणुकीत दोन्ही पक्षांच्या कामगार सेनेने हातमिळवणी केली आहे. या सोसायटीसाठी उद्या 18 ऑगस्ट रोजी मतदान होणार असून, या निवडणुकीत ठाकरे गटाची बेस्ट कामगार सेना आणि मनसेची बेस्ट कामगार सेना एकत्र आली आहे. या युतीविरोधात भाजपकडून ‘सहकार समृद्ध पॅनल’ निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. ठाकरे गटाच्या पॅनलचा पराभव करण्यासाठी भाजपचे नेते प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर मैदानात उतरले आहेत. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीविरोधात भाजपचा हा पॅनल थेट लढत देण्यासाठी सज्ज झाला आहे. आता बेस्टच्या कामगारांची निवडणूक तोंडावर असतानाच निवडणुकीला आणखी एक नवीन वळण लागल्याचे पाहायला मिळत आहे. 

बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीत 24 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे. पतसंस्थेतील उमेश सारंग आणि सुहास सामंत यांच्यावर प्रसाद लाड यांनी आरोप केला आहे. बेस्टच्या 21 संचालकांची चौकशी व्हावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. तर EOW कडून 21 संचालकांना चौकशीसाठी बोलावण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 

नेमकं काय म्हणाले प्रसाद लाड? 

प्रसाद लाड म्हणाले की, बेस्ट सहकारी पतसंस्थेतील भ्रष्टाचार घाग आणि गोरे यांच्या तक्रारीमुळे समोर आला आहे. मी माझ्या पतसंस्थेच्या सभासदांना सांगू इच्छितो की, ज्या पद्धतीने बंगले खरेदी, कार्यालय खरेदी, डिपॉझिट किकबॅक घेणे यामुळे प्रथमदर्शी 24 कोटीहून अधिकचा भ्रष्टाचार झाल्याचं EOW च्या निदर्शनास आले आहे. यात सर्व संचालकांची तर चौकशी होणारच आहे. उमेश सारंग जे पतसंस्थेचे शिवसेनेचे अध्यक्ष आहेत आणि बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांची देखील चौकशी झाली पाहिजे, ही माझी प्रामुख्याने मागणी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

ठाकरेंची सेना 19 तर मनसे 2 जागांवर निवडणुकीच्या रिंगणात

दि बेस्ट एम्प्लॉईज को. ऑप. क्रेडीट सोसायटीच्या निवडणुकीत उत्कर्ष पॅनल म्हणून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. बेस्टच्या पतपेढी निवडणुकीच 18 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. बेस्टच्या निवडणुकीत 21 जागापैकी ठाकरेंची सेना 19 तर मनसे 2 जागांवर निवडणूक लढवत आहे. तर ठाकरे बंधूंच्या विरोधात भाजपकडून ‘सहकार समृद्ध पॅनल’ निवडणुकीच्या रिंगणात आहे. ही निवडणूक उद्या पार पडणार असून या निवडणुकीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.  

आणखी वाचा 

Dadar Kabutar Khana: दादर कबुतरखान्यासंदर्भात BMC ने काढलं महत्त्वाचं पत्रक, पक्ष्यांचं खाणं बंद करण्यासाठी ‘या’ पोर्टलवर क्लिक करा

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *