
मुंबई : महापालिका निवडणुकीचे (BMC Election) वारे वाहू लागलं असून सर्वच पक्षांची मतदारांवर नजर आहे. हमखास मतदान मिळेल अशा मतदारांवर तर विशेष नजर आहे. या पार्श्वभूमीवर गिरगाव (Girgaon) भागात एक नवाच प्रकार समोर आला आहे. बोगस मतदार कसे वाढतात याचा हा नमुना आहे. गिरगाव भागातल्या काळबादेवीतील भरुचा नावाच्या सोसायटीतला हा नमुना आहे. इथले खोटे पत्ते वापरुन 148 परप्रांतियांनी अनधिकृतपणे आपलं मतदार ओळखपत्र (Girgaon Bogus Voters) आणि आधारकार्ड (Bogus Aadhar Card) काढल्याचं उघड झालं आहे. स्थानिक रहिवासी आणि ‘आम्ही गिरगावकर‘ टीमने बनावट कागदपत्रांचं प्रकरण समोर आलं.
बनावट आधारकार्ड आणि मतदान ओळखपत्रांसंबंधी लोकांनी तक्रार करताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, परंतु पुढं तपास ढिम्म आहे. या बोगस मतदारांची नावं वगळावी अशी मागणी या भरुचा सोसायटीतल्या लोकांनी केली.
Fake Address For Voting Card : झोपडपट्ट्यात राहणाऱ्यांनी सोसायटीचा पत्ता दिला
गिरगावातील भरुचा सोसायटी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून काही जण रस्त्यावर झोपड्या बांधून राहतात. संबंधित इमारत आधी भरुचा या नावाने ओळखली जात होती. आता रजिस्ट्रेशन झाल्यावर ही सोसायटी गुलमोहोर नावाने ओळखली जाते.
Girgaon Bogus Voter List : आधी वीज मीटर मिळवले
या सोसायटीत राहात नसलेलेही अनेकजण इथे मेंबर असल्याचं लक्षात आलं. या सोसायटीत अस्तित्वातच नसलेल्या फ्लॅटचे पत्ते देत आधी विजेचे मीटर मिळवण्यात आले. मग त्याआधारे पॅन, आधार, मतदार ओळखपत्र या लोकांनी मिळवलं.
Girgaon Bogus Aadhar Card : 1200 हून जास्त जण बोगस असल्याचा दावा
आतापर्यंत 148 जणांची तक्रार कऱण्यात आली आहे. मात्र जवळपास 1200 जण बोगस असल्याचा दावा करण्यात येत आहे. आता या लोकांना बनावट पत्त्यांच्या आधारे बनावट आधार, पॅन, व्होटर आयडी देणारे दलाल कोण? याचा शोध घेण्याची गरज आहे.
आणखी वाचा