
नवी मुंबई: दुबईमध्ये मोठ्या पगाराची नोकरी लावण्याचं आमिष दाखवून पीडित महिलेवर जबरदस्ती बलात्कार करणाऱ्या 55 वर्षीय सिराज इद्रीस चौधरी याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. वाशी पोलिस स्टेशनमध्ये त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. आरोपीने दुबईत जास्त पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून पीडित महिलेवर तिच्या कामाच्या ठिकाणी जबरदस्तीने बलात्कार केला. पीडितेने याबाबत वाशी पोलिस ठाण्यात तक्रार देताच वाशी पोलिसांनी आरोपी सिराज इद्रीस चौधरी याला अटक केली. इद्रीस चौधरी याच्यावर या आधी देखील गुन्हे दाखल असल्याचं पोलिस तपासात निष्पन्न झालं आहे. (Mumbai Crime News)
दुबईमध्ये मोठ्या पगाराची नोकरी मिळवून देऊ
नराधम आरोपीने पिडीत महिलेला दुबईमध्ये मोठ्या पगाराची नोकरी मिळवून देऊ असं आमिष दाखवून सिराज इद्रीस चौधरी या इसमाने पीडित महिलेला स्वत:च्या जाळ्यात ओढलं. काही दिवसांनी नोकरी मिळेल असं आमिष दाखवत त्याने या पीडित महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. 17 जून रोजी दाखल केलेल्या पिडीत महिलेच्या तक्रारीनुसार, या वर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान तिला या त्रासाला सामोरे जावे लागले, असे वाशी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेने याबाबत वाशी पोलिस ठाण्यात तक्रार देताच वाशी पोलिसांनी आरोपी सिराज इद्रीस चौधरी याला अटक केली असून न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. इद्रीस चौधरी याच्यावर या आधी देखील गुन्हे दाखल असल्याचं पोलिस तपासात निष्पन्न झालं आहे.अशी माहिती तपासाधिकारी पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब सांगळे यांनी दिली आहे.
बीडमध्ये प्रेम संबंधातून तरुणाला बेदम मारहाण
बीडमध्ये प्रेम संबंधातून एका तरुणाला मुलीच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटना बीडच्या गेवराई तालुक्यातील गंगावाडी येथे घडली आहे. याप्रकरणी पाच जणांवर तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून आता यात खुनाचे कलम वाढविले जाणार आहे. शिवम काशिनाथ चिकणे असे (21 वर्षीय) तरुणाचे नाव असून तो अभियंत्रिकीचे शिक्षण घेत होता.
शिवमचे गावातीलच एका मुली सोबत प्रेम संबंध होते. प्रियसीने घरी बोलावले असताना त्यावेळी अचानक नातेवाईक तेथे आले आणि त्यांच्यात वाद झाला. दरम्यान मुलीच्या नातेवाईकांनी शिवमला रस्त्यात गाठून लाठ्या-काठ्याने बेदम मारहाण केली. मारहाणी नंतर शिवमला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुलीच्या वडिलांना अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
आणखी वाचा