Headlines

Mumbai Crime: दादरमध्ये 700 किलो गोमांस सापडलं, मुंबई पोलिसांनी ट्रक पकडला

Mumbai Crime: दादरमध्ये 700 किलो गोमांस सापडलं, मुंबई पोलिसांनी ट्रक पकडला
Mumbai Crime: दादरमध्ये 700 किलो गोमांस सापडलं, मुंबई पोलिसांनी ट्रक पकडला



Mumbai Crime news: मुंबईतील दादर परिसरात रविवारी सकाळी एका ट्रकमध्ये गोमांस सापडल्याची घटना घडली. पोलिसांनी दादर परिसरात (Dadar news) एक ट्रक पकडला होता. या ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल 700 किलो गोमांस (Beef) आढळून आले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी ट्रक चालक जावेद नासीर खान (वय 34) याला अटक केली आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी (Mumbai Police) महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम कायदयांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अन्य दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. अटक करण्यात आलेल्या ट्रक चालकाच्या चौकशीतून आणखी कोणती माहिती पुढे येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (Mumbai news)

Bhiwandi news: झुरळ मारण्याचा स्प्रे मारताच गॅसचा भडका, पती-पत्नी जखमी

घरातील किडे-मुंगी आणि पाली यांचा बंदोबस्त करण्यासाठी अनेकजण किटकनाशक स्प्रे हमखास वापरतात. परंतु हाच स्प्रे किती घातक ठरु शकतो, याचा प्रत्यय भिवंडीतील (Bhiwandi News) एका विवाहित जोडप्याला आला आहे. ज्यामध्ये पती-पत्नी भाजले आहेत. जमाझहुर अहमद शहा (वय 48) व त्याची पत्नी सीमा जमाझहुर शहा (वय 40) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. जमाझहुर अहमद शहा हे भिवंडीतील निजामपूर परिसरात चहा विक्रीचा व्यवसाय करतात. ते रोज चहा घेऊन फिरतात. त्यासाठी नेहमीप्रमाणे त्यांची पत्नी सीमा शहा नेहमीप्रमाणे चहा तयार करत होती. (Bhiwandi Accident news)

शनिवारी घरात गॅसवर चहा बनवत असताना किचन ओट्याखाली पाल दिसल्याने सीमा शहा यांनी त्यांच्या पतीला बोलवून त्याठिकाणी किटकनाशक स्प्रे मारायला सांगितला. त्यावेळी जमाझहुर शहा यांनी घरात असलेले झुरळांचा स्प्रे पालीवर फवारला. त्यामुळे पाल पळाली. पण त्या स्प्रेचा मारा गॅसवर गेल्याने गॅसचा भडका (Gas blast) उडाला. या आगीत  त्या आगीत पती-पत्नी भाजले आहेत. दोघांच्या चेहऱ्यावर, हात व इतर होरपळले आहे. त्यांच्यावर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आणखी वाचा

ते फोटो ठरले शेवटचे….दिवाळीची सुट्टी फिरण्याचा प्लॅन अन् जिवलग मित्रांचा एकाच वेळी दुर्दैवी अंत; अस्तंबा यात्रेतून परतताना भीषण अपघातात मैत्रीचा शेवट

दारु प्यायला पैसे न द्यायला शेजाऱ्याचा नकार; संतापाच्या भरात दोघांनी आधी लाथा बुक्क्यांनी मारहाण नंतर घातला कुऱ्हाडीने घाव अन्…

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *