Headlines

Mumbai Dry Fruit Market | युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात मोठी वाढ, प्रति किलो दर किती?

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता मुंबईतील ड्रायफ्रूट बाजारावरही दिसून येऊ लागला आहे. मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमधील ड्रायफ्रूट विक्रेत्यांनी सांगितले की, इराणमधून आयात होणाऱ्या सुका मेव्याच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे.
क्रॉफर्ड मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रायफ्रूटची दुकाने असून येथे खजूर, पिस्ता, मामरा बदाम तसेच इराणी अंजीर यांची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. मात्र युद्धपरिस्थितीमुळे इराणमधून होणाऱ्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे या सुका मेव्यांच्या किमतींमध्ये वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. दुकानदारांच्या माहितीनुसार, इराणी अंजीर आणि मामरा बदाम यांसारख्या ड्रायफ्रूटच्या किमती प्रति किलो सुमारे 400 ते 500 रुपयांनी वाढल्या आहेत. तर पिस्त्याच्या दरातही वाढ झाली आहे. दरम्यान, खजूरच्या किमतींवर तुलनेने कमी परिणाम झाला आहे. खजूरचे दर प्रति किलो सुमारे 150 ते 200 रुपयांनी वाढले असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. युद्धपरिस्थिती कायम राहिल्यास पुढील काळात ड्रायफ्रूटच्या किमतींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *