Maharashtra 2024 Zeenia AI Exit Poll: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झालं असून, आता सर्वांचं लक्ष 23 नोव्हेंबरला येणाऱ्या निकालाकडे आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटीनंतर होणारी ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्याने या निकालाकडे फक्त महाराष्ट्र नाही तर देशाचं लक्ष आहे. हा निकाल अनेकांचं भवितव्य ठरवणारा आहे. दरम्यान निकालाआधी आम्ही तुमच्यासाठी एक्झिट पोल घेऊन आलो आहोत. Zeenia AI Exit Poll नुसार मुंबईत नेमका काय निकाल असेल याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबईतला निकाल काय असेल?
मुंबईत एकूण 36 जागा आहेत. मुंबईतील अनके जागांवरील लढाई प्रतिष्ठेची आहे. एक्झिट पोलमधील अंदाजानुसार, मुंबईत महायुती-मविआत काँटे की टक्कर होईल. महायुती आणि मविआला समसमान जागा मिळतील अशी शक्यता आहे. महायुती आणि मविआला प्रत्येकी 15 ते 20 जागा मिळतील असा अंदाज आहे. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पिछेहाट होण्याची शक्यता आहे.
महायुती 15-20
मविआ 15-20
इतर 00-01
महाराष्ट्रात काय निकाल असेल?
एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीत अटीतटीची लढाई दिसत आहे. वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार, महायुतीला 129 ते 159 आणि महाविकास आघाडीला 124 ते 154 जागा मिळतील.
महाराष्ट्र – 288
महायुती 129-159
मविआ 124-154
लोकसभा निवडणुकीत कसा होता Zeenia चा एक्झिट पोल
AI Anchor Zeenia च्या एक्झिट पोलमध्ये जी आकडेवारी दिली होती त्यानुसार, एनडीए आघाडीला 305 जागा, इंडिया आघाडीला 180 जागा आणि इतरांना 58 जागा देण्यात आल्या होत्या. जेव्हा निकाल आले, तेव्हा एनडीए आघाडीला 293 जागा मिळाल्या, ज्या इतर कोणत्याही एक्झिट पोलपेक्षा अधिक अचूक आणि वास्तविक आकडेवारीच्या जवळ होत्या. तर इंडिया आघाडीला 234 जागा मिळाल्या. अशा प्रकारे झी न्यूज एआय अँकर झीनियाचा एक्झिट पोल इतर कोणत्याही एक्झिट पोलपेक्षा अधिक अचूक आणि विश्वासार्ह असल्याचं सिद्ध झालं.
कशाप्रकारे तयार करण्यात आला AI Exit Poll
2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने झी न्यूजने पहिल्यांदाच Artificial Intelligence वापर करून एक्झिट पोल जारी केला होता. आणि Zee News AI Anchor Zeenia ने दिलेल्या एक्झिट पोलसमोर मोठे दिग्गज फेल ठरले होते.
– यंदाचा एक्झिट पोल हा लोकांच्या समाजमाध्यमांवरच्य प्रतिक्रियांच्या आधारे तयार केला गेला आहे.
– समाजमाध्यमांवरच्या 15 लाखांहून अधिक प्रतिक्रियांचं विश्लेषण केलं आणि तोच सँपल साईज आहे.
– महाराष्ट्रातून जवळपास 10 लाख प्रतिक्रियांचं विश्लेषण केलं
– इतका मोठा सँपल साइज एक्झिट पोलमध्ये कुणाचाच नसेल.
(महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागतील. तत्पूर्वी ZEE २४ तास ने आपल्या प्रेक्षकांसाठी AI एक्झिट पोल आणला आहे. या एक्झिट पोलमध्ये आम्ही आर्टिफीशिअल इंटेलिजेन्सचा वापर केलाय. डेटा कलेक्शन आणि डेटा प्रोसेसिंगमध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय. उल्लेखनीय बाब म्हणजे, झी २४ तास तुम्हाला जे आकडे दाखवत आहे, ते सर्व्हे एजंसीचे आहेत. हे आकडे विधानसभा निवडणुकीचे निकाल नसून केवळ एक्झिट पोलची आकडेवारी आहे. एक्झिट पोलचे आकडे आणि निकाल यात फरक असू शकतो.)