
मुंबई: जोगेश्वरीमध्ये इमारतीला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. एकाच इमारतीतील चार माळ्यांना आग लागल्याची माहिती आहे. जेएनएस बिझनेस सेंटरला (Massive fire breaks out in JMS Business Park) ही आग लागली आहे. काही लोक अडकल्याची माहिती आहे. आगीचं कारण अस्पष्ट आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.(Massive fire breaks out in JMS Business Park)
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिम ओशिवरा भागात JMS बिजनेस पार्क इमारतीमध्ये मोठी आग लागली. सकाळी साडेदहाच्या सुमारास इमारतीचा एका गाळ्यामधे ही मोठी आग लागली. मात्र नंतर आग चार माळ्यांवर पसरली. घटनेची माहिती मिळतात अग्निशमन दलाचा पाच ते सहा गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आग विझविण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट ऑफिस आहेत, त्यामुळे आग आजूबाजूला वाढण्याची शक्यता आहे. सुदैवाने या यागीमध्ये कुठलीही जीवित हानी झाली नसून मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आग कशामुळे लागली या संदर्भात ओशिवरा पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान अधिक तपास करत आहे.
आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. या इमारतीच्या अगदी वरच्या मजल्यावर असलेल्या रहिवाशांकडून मदतीसाठी बचावासाठी हाका मारल्या जात आहेत. त्यांचा जीव वाचवून सुखरूपपणे बाहेर काढण्यासाठी देखील फायर ब्रिगेडचे जवान प्रयत्न करत आहेत. इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट ऑफिस आहेत, त्यामुळे आग आजूबाजूला वाढण्याची शक्यता आहे. सुदैवाने या यागीमध्ये कुठलीही जीवित हानी झाली नसून मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
आणखी वाचा