Headlines

Mumbai Ganpati Visarjan 2025 : धक्कादायक! मुंबईत बाप्पाच्या निरोपात शोककळा, विजेचा शॉक लागून एकाच मृत्यू, तर चार गंभीर जखमी

Mumbai Ganpati Visarjan 2025 : धक्कादायक! मुंबईत बाप्पाच्या निरोपात शोककळा, विजेचा शॉक लागून एकाच मृत्यू, तर चार गंभीर जखमी
Mumbai Ganpati Visarjan 2025 : धक्कादायक! मुंबईत बाप्पाच्या निरोपात शोककळा, विजेचा शॉक लागून एकाच मृत्यू, तर चार गंभीर जखमी


मुंबई : गणेश विसर्जनाच्या उत्साहात साकीनाका परिसरात दुर्दैवी घटना घडली आहे. खैराणी रोड परिसरात श्री गजानन मित्र मंडळाची विसर्जन मिरवणूक जात असताना ट्रॉलीला हाय टेन्शन वायरमधून शॉक बसला. यात एका तरुणाचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली. SJ स्टुडिओसमोर खैराणी रोडवर हाय टेन्शन वायरमधून एक छोटी वायर खाली लटकत होती. ही वायर थेट विसर्जन ट्रॉलीला लागल्याने पाच जणांना विद्युत धक्का बसला.

एकाचा मृत्यू, चार गंभीर जखमी

जखमींमध्ये बिनू शिवकुमार (वय 36) या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर तुषार गुप्ता (18), धर्मराज गुप्ता (44), आरुष गुप्ता (12), शंभू कामी (20) आणि करण कानोजिया (14) हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नेमकी घटना कशी घडली?

गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या जल्लोषानंतर आज बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. शनिवार सकाळपासूनच मुंबईसह (Mumbai Ganpati Visarjan 2025) राज्यभरात गणेश विसर्जन मिरवणुका मोठ्या उत्साहात सुरू झाल्या. मुंबईच्या साकीनाका खैराणी रोड परिसरात पण श्री गजानन मित्र मंडळाची गणेश विसर्जनाची ट्रॉली मिरवणुकीतून जात होती. त्या रस्त्यावरून टाटा पॉवर कंपनीची 11 हजार व्होल्टेजची हाय टेन्शन वायर जाते. त्या वायरमधूनच एक छोटी वायर खाली लटकत होती. ही वायर थेट गणपतीची ट्रॉलीला स्पर्श झाली. पाच जण गंभीर जखमी झाले. त्यापैकी बिनू शिवकुमार (36 वर्षे) या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

“टाटा कंपनीच्या कार्यालयात घुसून तोडफोड करू….” मनसेचे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली आक्रमक

साकीनाका परिसरात टाटा कंपनीच्या 11 हजार व्होल्टेजच्या वायरी मोठ्या प्रमाणात आहेत. या वायरी खाली असल्याने यापूर्वीही तीन ते चारवेळा शॉक लागून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेनंतर परिसरातील नागरिकांसह मनसेचे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली आक्रमक झाले. “साकीनाका पोलिसांनी टाटा पावर विरोधात गुन्हा दाखल करून जबाबदार अधिकाऱ्यांना तात्काळ अटक केली नाही, तर आम्ही टाटा कंपनीच्या कार्यालयात घुसून तोडफोड करू,” असा इशारा भानुशाली यांनी दिला आहे. या दुर्घटनेनंतर नागरिक प्रशासन व टाटा पावरच्या निष्काळजीपणाबद्दल संतप्त झाले आहेत. खैराणी रोड परिसरातील लोक सतत भीतीच्या छायेत जीवन जगत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

हे ही वाचा –

Ganpati Visarjan 2025 LIVE: लालबागचा राजा थोड्याचवेळात विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल होणार

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *