
Mumbai Local Accident : मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकलच्या गर्दीने पुन्हा एकदा एका व्यक्तीचा बळी घेतला आहे. गर्दीच्या रेट्यामुळे धावत्या लोकलमधून पडून महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना (Mumbai Local Train Accident) घडली आहे. गणेश जगदाळे असे या 31 वर्षीय मृत जवानाचे नाव असून ते दहिसर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ते ड्युटी संपवून दहिसर स्थानकातून नायगावला जाण्यासाठी लोकल पकडली. मात्र प्रचंड गर्दीमुळे ते दरवाज्याजवळ उभे असताना मालाड-गोरेगाव (Malad Goregaon) दरम्यान धक्काबुक्की झाली आणि ते सरळ रुळावर पडले. यात त्यांना गंभीर दुखापत (Local Train Accident) झाली आणि त्यामुळे त्यांना कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
Andheri Crime : आरे कॉलनीत नृत्यांगनेवर बलात्कार; नृत्य प्रशिक्षक, इव्हेंट ऑर्गनायझरला पोलिसांनी केली अटक
आरे पोलिसांनी 22 वर्षीय नृत्य प्रशिक्षक आणि इव्हेंट ऑर्गनायझर असलेल्या तरुणाला एका 32 वर्षीय व्यावसायिक नृत्यांगनेवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक केली आहे. पीडिता अंधेरीत राहणारी असून ती चित्रपट आणि स्टेज शोमध्ये पार्श्वभूमी नृत्यांगना म्हणून काम करते. आरोपी हा मालाडचा रहिवासी असून डान्स कोच आणि कार्यक्रम आयोजक आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर आरे पोलिसांनी भा.न्या.सं.च्या संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
पूरग्रस्तांसाठी पोलिसांची सहा लाख रुपयांची मदत (Police Help for Flood Victims)
अतिवृष्टीने बीड जिल्ह्यात झालेल्या नुकसानीनंतर सामाजिक जबाबदारी ओळखून बीड जिल्हा पोलीस दलाने पूरग्रस्त बांधवांसाठी मदतीचा हात पुढे केलाय. पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी 50 हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देऊन या उपक्रमाची सुरुवात करत आवाहन केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील पोलिस अधिकारी आणि अंमलदारांनी एकत्र येत एकूण 6 लाख 39 हजारांचा निधी गोळा केला. हा संपूर्ण निधी पूरग्रस्तांना मदत म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीस सुपूर्द करण्यात आलाय. पोलिस दलाच्या या कृतीतून ‘जनतेसाठी पोलिस’ हा संदेश देण्यात आला आहे. यापूर्वीही बीड पोलिसांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविलेले आहेत.
आणखी वाचा
आणखी वाचा