Headlines

Mumbai News: दुबईहून मुंबईला येणाऱ्या विमानात चक्क सिगारेटचा धूर; प्रवाशांमध्ये एकच खळबळ, गुन्हा दाखल

Mumbai News: दुबईहून मुंबईला येणाऱ्या विमानात चक्क सिगारेटचा धूर; प्रवाशांमध्ये एकच खळबळ, गुन्हा दाखल
Mumbai News: दुबईहून मुंबईला येणाऱ्या विमानात चक्क सिगारेटचा धूर; प्रवाशांमध्ये एकच खळबळ, गुन्हा दाखल


Mumbai News: दुबईहून मुंबईला येणाऱ्या विमानात एक विचित्र घटना घडल्याचे समोर आलं आहे. यात उड्डाण घेतलेल्या एका विमानात एका प्रवाशाने चक्क सिगारेट काढत ती पेटवून ओढायला सुरवात केलीय. विमानात धूम्रपान बंदी असताना त्याने हि सिगारेट आणलीच कशी असा सवाल साऱ्यांना पडला.  तर त्याचे कृत्य पाहून विमानातील इतर सर्वजण प्रथम हैराण झाले आणि नंतर भीतीने संतापले. दुबईहून मुंबईला येणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानात ही घटना घडली.

या प्रकरणी मुंबईच्या सहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार, दुबईहून मुंबईला येणाऱ्या स्पाइसजेटच्या एसजी-60 विमानाच्या शौचालयात बसून एका व्यक्तीने सिगारेट ओढायला सुरुवात केली. आरोपीचे नाव मुर्तझ राली खान असे आहे.

क्रू मेंबरला आला टॉयलेटमधून सिगारेटचा वास 

मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, स्पाइसजेट एअरलाइन्सने दुबईहून मुंबईला जाण्यासाठी टेकऑफ केलं होतं. केबिन क्रूने प्रवाशांना आवाहन केले की धूम्रपान करण्यास मनाई आहे आणि म्हणून असे करू नका. विमान वाहतुकीच्या नियमांनुसार, विमानात धूम्रपान निषेधाचे फलकही लावण्यात आले होते. रात्री उशिरा 10 वाजताच्या सुमारास वरिष्ठ केबिन क्रू सदस्य महेश लोला यांना सिगारेटचा धूर येऊ लागला. यानंतर 1 के मध्ये बसलेल्या प्रवासी मुर्तजा खानशी संपर्क साधण्यात आला.

क्रू मेंबरने पायलटकडे केली तक्रार 

दरम्यान, यावर महेश लोला यांनी मुर्तजा खानची चौकशी केली, ज्याने विमानाच्या मागील बाजूस असलेल्या शौचालयात ई-सिगारेट ओढल्याचे कबूल केले. खान यांनी हिरवी ई-सिगारेट दाखवली, जी महेश लोला यांनी जप्त केली. प्रोटोकॉलचे पालन करून क्रू मेंबर महेश लोला यांनी पायलटला याबद्दल माहिती दिली. त्यानंतर विमानतळ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली.

मुंबई विमानतळावरील सुरक्षा रक्षकाला देण्यात आली माहिती 

स्पाइसजेट एअरलाइन्सचे ड्युटी मॅनेजर चंद्रकांत सोनवणे यांनी मुर्तजा खानविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. विमान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (मुंबई टर्मिनल 2) पोहोचताच, कर्तव्यावर असलेल्या स्पाइसजेट सुरक्षा कर्मचाऱ्यांना कळविण्यात आले की या विमानातील एका प्रवाशाने धूम्रपान निषेध नियमांचे उल्लंघन केले आहे.

पोलिसांसमोर हजर राहण्याची नोटीस

यानंतर, जवळच्या सहार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आणि मुर्तजा खानविरुद्ध बीएनएसच्या कलम १२५ आणि विमान नियम 1936 च्या कलम 25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहार पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांनी प्रवाशाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि त्याला पोलिसांसमोर हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *