Headlines

Mumbai News: मुंबईत मोठ्या घातपाताचा कट? 'त्या' घरात सापडले ‘अणुबॉम्ब डिझाइन’शी संबंधित 14 नकाशे; नेमकं काय घडलं?

Mumbai News: मुंबईत मोठ्या घातपाताचा कट? 'त्या' घरात सापडले ‘अणुबॉम्ब डिझाइन’शी संबंधित 14 नकाशे; नेमकं काय घडलं?
Mumbai News: मुंबईत मोठ्या घातपाताचा कट? 'त्या' घरात सापडले ‘अणुबॉम्ब डिझाइन’शी संबंधित 14 नकाशे; नेमकं काय घडलं?



मुंबई: भाभा अणु संशोधन केंद्राचे बनावट शास्त्रज्ञ असल्याचे भासवणाऱ्या अख्तर हुसेन कुतुबुद्दीन अहमद या इसमाला मुंबई गुन्हे शाखेने राष्ट्रीय तपास संस्था (NIA) आणि गुप्तचर विभाग (IB) यांच्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली आहे. या आरोपीच्या निवासस्थानाची झडती घेतल्यानंतर तपासकर्त्यांना थेट ‘अणुबॉम्ब डिझाइन’शी संबंधित 14 अत्यंत संवेदनशील नकाशे आणि कागदपत्रे सापडली आहेत. त्यामुळे सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे. मुंबई गुन्हे शाखेकडून या बनावट BARC शास्त्रज्ञाला अटक करण्यात आली होती. या कारवाईत संभाव्य राष्ट्रीय सुरक्षेचा गंभीर धोका उघड झाला आहे. अटक झालेल्या अख्तरच्या निवासस्थानी झडती घेतली असता, पोलिसांना अणुबॉम्बच्या आराखड्याशी संबंधित असल्याचा संशय असलेली १४ अत्यंत संवेदनशील नकाशे आणि अनेक कागदपत्रे सापडली. 

तपासादरम्यान अख्तर हुसेन कुतुबुद्दीन अहमद यांच्या घरातून अनेक महत्त्वाची कागदपत्रं आणि अणुबॉम्ब डिझाइनशी संबंधित तब्बल 14 संवेदनशील नकाशे जप्त करण्यात आले आहेत. या नकाशांचा स्रोत आणि उद्देश याबाबत आता गंभीर चौकशी सुरू आहे. या नकाशे अख्तर हुसेनकडे कसे आणि कुठून आले? ते स्वतःकडे ठेवण्यामागचा हेतू काय होता? तसेच त्याचे कोणाशी संबंध आहेत आणि या माध्यमातून भाभा अणु संशोधन केंद्रात घातपाताचा कट रचला गेला होता का, याचाही तपास सुरू आहे.गुप्तचर आणि तपास यंत्रणांनी या प्रकरणाचा बहुआयामी तपास सुरू केला असून, यामध्ये आणखी काही जणांची अटक होण्याची शक्यता नाकारली जात नाही. पुढील काही दिवसांत या प्रकरणातील अनेक महत्त्वाचे धागेदोरे स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Mumbai News: भाभा अणु संशोधन केंद्र म्हणजे काय?

भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) हे भारतातील अणु संशोधन आणि तंत्रज्ञान विकासाचे प्रमुख केंद्र मानले जाते. मुंबईतील ट्रॉम्बे येथे असलेले हे केंद्र अणु ऊर्जा, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विविध क्षेत्रांमध्ये अग्रगण्य संशोधन करते. भारताच्या अणु कार्यक्रमाच्या उभारणीत आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित अणु तंत्रज्ञानाच्या विकासात बीएआरसीची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण राहिली आहे. याच संस्थेमुळे भारताला अणुऊर्जेच्या निर्मितीपासून ते अण्वस्त्रांपर्यंत, तसेच शांततेच्या हेतूने वापरण्यात येणाऱ्या रेडिओआयसोटोप्सच्या उत्पादनापर्यंत अनेक क्षेत्रांत प्रगती साधता आली.

Mumbai News: भाभा अणु संशोधन केंद्राचा इतिहास

1954 च्या जानेवारी महिन्यात प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ डॉ. होमी जहांगीर भाभा यांनी “अॅटॉमिक एनर्जी इस्टॅब्लिशमेंट, ट्रॉम्बे” (AEET) या नावाने या संस्थेची स्थापना केली. यापूर्वी, 1944 मध्ये त्यांनी टाटा ट्रस्टकडे मूलभूत भौतिकशास्त्र संशोधनासाठी प्रस्ताव सादर केला, ज्यातून पुढे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) स्थापन झाले. मात्र, भारतात अणु तंत्रज्ञानाच्या स्वतंत्र संशोधनाची आवश्यकता भासल्याने एईईटीची स्थापना करण्यात आली. 1967 मध्ये डॉ. भाभा यांच्या निधनानंतर त्यांच्या योगदानाच्या सन्मानार्थ या संस्थेचं नाव बदलून ‘भाभा अणु संशोधन केंद्र (BARC)’ असं ठेवण्यात आलं. आजही बीएआरसी हे भारताच्या अणु संशोधन आणि स्वावलंबनाचे प्रतीक मानले जाते आणि देशाच्या संरक्षण, ऊर्जा व वैज्ञानिक प्रगतीच्या दृष्टीने हे केंद्र अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *