
Mumbai Rains Local Trains Update: मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस (Mumbai Rains) सुरू आहे. आज (25 जुलै) दिवसभरात मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सकाळपासूनच मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. आता पावसामुळे मुंबईतील लोकलसेवेवर देखील परिणाम झाला आहे.
पश्चिम उपनगरात काही वेळ पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पुन्हा मागचा दहा ते पंधरा मिनिटांपासून पावसाचे जोर वाढला आहे. जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे पुन्हा पश्चिम उपनगरात सखल भागात पाणी भरायला सुरुवात होत आहे. तसेच पावसामुळे मध्य (Central Railway Local) आणि पश्चिम रेल्वेची (Western Railway Local) वाहतूक उशिराने धावत आहे.
पश्चिम रेल्वेची सध्या काय स्थिती?- (Western Railway Local Updates)
पश्चिम रेल्वेची लोकल सेवा 10 ते 15 मिनिटं उशिराने सुरु आहे.
मध्य रेल्वेची सध्या काय स्थिती?- (Central Railway Local Updates)
मध्य रेल्वेची लोकल सेवा 15 ते 20 मिनिटं उशिराने सुरु आहे.
हार्बर रेल्वेची सध्या काय स्थिती?- (Harbour Railway Local Updates)
हार्बर रेल्वे देखील 15 मिनिटं उशीराने धावत आहे.
अंधेरी सबवेने अक्षरशः नदीचं रूप केलं धारण-
अंधेरी सबवेने अक्षरशः नदीचं रूप धारण केलं आहे. वरच्या भागातून आलेलं मोठ्या प्रमाणातलं पाणी थेट सबवेमध्ये शिरलं असून संपूर्ण सबवे पाण्याखाली गेलेलं आहे. परिणामी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली असून गाड्या दुसऱ्या मार्गाने वळवण्यात येत आहेत. यामुळे अंधेरी परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाकडून मात्र परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
राज्यात आज मुसळधार; कोणत्या भागात कोणता अलर्ट?,
मुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट): रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.
जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) : मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, वर्धा, नागपूर.
जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) : पालघर, नाशिक घाटमाथा, सातारा, कोल्हापूर, अमरावती, हिंगोली, नांदेड.
विजांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) : जालना, परभणी, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ.
मुंबईसह राज्यातील पावसाचे सर्व घडामोडी, VIDEO:
संबंधित बातमी:
आणखी वाचा