Headlines

Mumbra local Train Accident : मोठी बातमी: मुंब्रा रेल्वे अपघाताचं धक्कादायक कारण आलं समोर; अहवालात सगळं सांगितलं, पावसामुळे खचलेल्या जागेचे…

Mumbra local Train Accident : मोठी बातमी: मुंब्रा रेल्वे अपघाताचं धक्कादायक कारण आलं समोर; अहवालात सगळं सांगितलं, पावसामुळे खचलेल्या जागेचे…
Mumbra local Train Accident : मोठी बातमी: मुंब्रा रेल्वे अपघाताचं धक्कादायक कारण आलं समोर; अहवालात सगळं सांगितलं, पावसामुळे खचलेल्या जागेचे…



Mumbra local Train Accident : मुंबईतील मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंब्रा स्थानकाजवळ 9 जून रोजी घडलेल्या दुर्दैवी लोकल अपघाताचे कारण समोर आलं आहे. रेल्वे अभियंत्यांनी पावसामुळे खचलेल्या जागेचे दुरुस्तीचे काम वेळेत न करता दुर्लक्ष केल्यानेच हा अपघात झाल्याचे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, पावसामुळे रुळाखालील खडी आणि माती वाहून गेल्याची कल्पना असतानाही रेल्वेचे सिनियर सेक्शन इंजिनियर समर यादव आणि असिस्टंट डिव्हिजनल इंजिनियर विशाल डोळस यांनी दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. दोन लोकल एकमेकांना घासल्या गेल्याने झालेल्या या रेल्वे अपघातात 5 जणांचा मृत्यू तर 9 जण जखमी झाले होते.

Mumbra local Train Accident : अहवाल मिळानंतर गुन्हा दाखल, VJTI च्या अहवाला नेमकं काय?

मिळालेल्या माहितीनुसार, मोठ्या पावसानंतर रेल्वे रुळाचे किरकोळ काम करून वेल्डिंग न केल्याने दोन रेल्वे रुळ वरखाली होऊन दोन लोकल एकमेकांच्या अगदी जवळ आल्याने प्रवासी घासले गेले होते, असा व्हिजेटीआयच्या अहवाला नमूद करण्यात आले आहे. रेल्वेच्या एसआयटीने विनंती केल्यानंतर व्हिजेटीआय या संस्थेने अहवाल दिल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मुंब्रा परिसरात अपघाताच्या आधी चार दिवस मोठा पाऊस पडल्याने रेल्वे रुळांच्या खालची खडी आणि माती वाहून गेली होती आणि जमीनही खचली होती, असेही एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Local Train Accident : अपघाती वेळी मुंब्रा स्थानकातील लोकलचा वेग ताशी 75 किमी होता

दरम्यान, या सगळ्याची माहिती असताना रेल्वे अधिकारी समर यादव आणि विशाल डोळस यांनी दुर्लक्ष करून क्वाशन ऑर्डर म्हणजे काम करण्याची ऑर्डर घेऊन सुध्दा काम न केल्याचे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. रेल्वेच्या नियमानुसार काम सुरू असल्यास किंवा दुरुस्तीचे काम करावयाचे असल्यास रेल्वेचा वेग हा ताशी 69 किमी असायला हवा, पण असे असतानाही मुंब्रा स्थानकातील लोकलचा वेग ताशी 75 किमी होता, असेही तपासात समोर आले आहे.

मुंब्रा स्थानकावर नेमका कसा झाला होता अपघात?

– दिवा ते मुंब्रा दरम्यान ही दुर्घटना घडली
– एक लोकल कसाराकडून सीएसटीकडे जात होती तर दुसरी लोकल सीएसटीकडून कल्याणकडे जात होती 
– सकाळी साडे नऊ वाजता दरम्यानची घटना 
– दोन्ही लोकलच्या दरवाजात उभे असलेले प्रवासी पडले 
– दोन्ही लोकलमधील प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागला 
– बॅगांची गुंतागुंत झाली आणि ही घटना घडल्याची शक्यता 
– पुष्पक एक्सप्रेसचा या घटनेशी कोणताही संबंध नाही 
– ⁠एकूण 13 जणांना रुग्णालयात दाखल केले आहे.

मध्य रेल्वेचे माहिती अधिकारी स्वप्नील निला यांनी सगळी घटना सांगितली. लोकलमधून प्रवासी फूटओव्हरवरुन प्रवास करत होते. एका ट्रॅकवरुन सीएसएमटीकडे लोकल जात होती. तर दुसऱ्या ट्रॅकवरुन कसाराच्या दिशेने लोकल जात होती. यावेळी दोन्ही लोकलमधील दरवाजावरील प्रवाशांची बॅग एकमेकांना घासली गेली. 

हे ही वाचा –

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *