Oplus_0
नवी मुंबई महानगरपालिका हद्दीमध्ये अनेक ठिकाणी विनापरवाना होर्डिंगबाजी व जाहिरातबाजी सुरू असल्याची चर्चा नवी मुंबईकर करत आहेत…..
होर्डिंग लावण्यासाठी बऱ्याच झाडांची कत्तल करण्यात आली आहे मात्र आजपर्यंत कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही…..
सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आलेले अधिकारी याची चौकशी करणार का?…..
गावठाण भागातील इमारतीवर, सोसायटीच्या आवारामध्ये लाखो रुपये मलिदा मिळत असल्याने नियमांचे उल्लंघन करून लावले होर्डिंग, होर्डिंग लावण्यासाठी अडथळा येणाऱ्या झाडांची ची देखील कत्तल करण्यात आलेली आहे. स्थानिक नेत्यांचा दबाव येत असल्याने नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी कारवाई करत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत……
रेल्वे लाईन लगत भले मोठे होर्डिंग लावण्यात आले आहेत मात्र यावर कारवाई कोण करणार ? नियमापेक्षा जास्त उंच हे होर्डिंग आहेत. जर एखादी दुर्घटना घडली तर जीव मात्र नवी मुंबईतील नागरिकांचा जाईल……