Headlines

Nanded | हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं पीक मातीमोल, शेतकऱ्यांना लाखोंचा फटका

Nanded | हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं पीक मातीमोल, शेतकऱ्यांना लाखोंचा फटका
Nanded | हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं पीक मातीमोल, शेतकऱ्यांना लाखोंचा फटका


नांदेड जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अर्धापूर तालुक्यातील सोनाळा परिसरात एका शेतकऱ्याने नगदी पीक म्हणून हळदीची लागवड केली होती. मागील वर्षापासून हळदीकडे वळलेल्या या शेतकऱ्याला यंदा चांगले उत्पादन मिळाले होते. एकरी सुमारे 30 क्विंटल इतके उत्पन्न अपेक्षित असताना अचानक झालेल्या पावसाने परिस्थिती बदलली. काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतात दोन फूटांपर्यंत पाणी साचले. त्यामुळे संपूर्ण हळदीचे पीक भिजून खराब झाले आहे. भिजलेली हळद वापरण्यायोग्य राहणार नसल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हळद हे नगदी पीक असल्याने आणि त्याला बाजारात चांगला दर मिळत असल्यामुळे अनेक शेतकरी हळदीच्या लागवडीकडे वळत आहेत. मात्र अशा नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *