राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन ला मोठे यश.
समान काम समान वेतन ची मागणी लवकरच पूर्ण होणार….
राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन चे संस्थापक अध्यक्ष मा आमदार शशिकांत शिंदे साहेब ,नितीन चव्हाण साहेब,कामगार प्रतिनिधी संजय सुतार,चंद्रकांत चिकने, राज कदम,नितीन बांगर यांनी समान काम समान वेतन बाबत पाठपुरावा केलेले मुद्दे खालील प्रमाणे..
१) दिनांक 23/02/2021 रोजी मा आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेऊन मा. आमदार शशिकांत शिंदेसाहेबानी समान काम समान वेतन ची मागणी केली होती.
२) त्यानंतर दिनांक 07/04/2021 रोजी नगर विकास राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे साहेब यांच्या मंत्रालयातील दालनात मा आमदार शिंदे साहेब महापालिका अति,आयुक्त कामगार प्रतिनिधी यांच्या समवेत समान काम समान वेतन बाबत मीटिंग आयोजित करण्यात आली होती. (या आधी कोणत्याही संघटनेने समान काम समान वेतन ची मागणी केली नव्हती,प्रथम मा आमदार शशिकांत शिंदे साहेबानी समान काम समान वेतन चा विषय हाती घेतला होता)
३)दिनांक 07/04/2021 रोजी झालेल्या मीटिंग दखल घेऊन मा नगर विकास राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे साहेबानी 27/04/2021 रोजी नवी मुंबई महानगर पालिका यांना लेखी आदेश दिले की समिती स्थापन करून पदनामनुसार समान काम समान वेतन लागू करावे तसा अहवाल नगर विकास विभागाला सादर करावा.
४) दिनांक 02/09/2021 रोजी मा आयुक्त अभिजीत बांगर साहेब यांची भेट घेऊन कंत्राटी कामगारांना महाराष्ट्र काँट्रॅक्ट लेबर(रेगुलेशन ऍण्ड अबोलेशन)1971 नुसार वेतन प्रणाली निश्चित करून समान काम समान वेतन ची अंमलबजावणी करावी असे राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन तर्फे निवेदन देण्यात आले.
त्यानुसार आज दिनांक 22/03/2021 रोजी आयुक्तांनी सदर नियुक्त केलेल्या कमिटी सोबत मीटिंग घेऊन काँट्रॅक्ट लेबर 1971 नुसार समान काम समान वेतन चा अहवाल तयार करून सादर करण्याचे आदेश दिले.
राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेने पाठपुरावा केला त्यांच्या पूर्ण कागद पत्रासहित तपशील खाली दिलेल्या लिंक वर भेटेल.
संजय सुतार
कामगार प्रतिनिधी
नवी मुंबई महानगरपालिका
8082347721