Headlines

Navi Mumbai Airport Flight: नवी मुंबई विमानतळावरुन पहिलं उड्डाण 25 डिसेंबरला; दिल्ली, गोवासह 4 शहरांसाठी थेट सेवा

Navi Mumbai Airport Flight: नवी मुंबई विमानतळावरुन पहिलं उड्डाण 25 डिसेंबरला; दिल्ली, गोवासह 4 शहरांसाठी थेट सेवा
Navi Mumbai Airport Flight: नवी मुंबई विमानतळावरुन पहिलं उड्डाण 25 डिसेंबरला; दिल्ली, गोवासह 4 शहरांसाठी थेट सेवा



नवी मुंबई: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय (Navi Mumbai Airport Flight) विमानतळ २५ डिसेंबरपासून प्रवासी सेवेसाठी सुरू होणार आहे. मात्र, एअर कॅरिअरच्या विमान भाड्यात तफावत (Navi Mumbai Airport Flight) असल्याचं समोर आलं आहे. नवी मुंबईतून इंडिगोचे भाडे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापेक्षा अधिक, तर अकासा एअरचे भाडे त्याउलट कमी असल्याचं समोर आलं आहे. अकासा एअरनंतर इंडिगोकडूनही कालपासून नवी मुंबईवरुन उड्डाणांची नोंदणी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. इंडिगोकडून नवी मुंबईवरून १० भारतीय शहरांसाठी उड्डाणांची सुविधा उपलब्ध तर अकासाकडून दिल्ली, कोच्ची, गोवा आणि अहमदाबादसाठी सेवा नियमितसुरू राहणार आहे.या विमानतळाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ ऑक्टोबर रोजी झाले होते. उद्घाटनानंतर केवळ दोन महिन्यांत विमानतळ पूर्ण क्षमतेने उड्डाण सेवेसाठी सज्ज झाले आहे.(Navi Mumbai Airport Flight) 

दोन्ही विमानतळांवरील भाड्यात काही रुपयांचा फरक, ज्यात नवी मुंबई विमानतळावरील ‘यूजर डेव्हलपमेंट फी’ हा मुख्य घटक असल्याची सूत्रांची माहिती समोर आली आहे.

नवी मुंबईवरुन विमान भाडे – २६ डिसेंबरसाठी 
दिल्लीसाठी – 
इंडिगो – ६ हजार २७४ रुपये 
अकासा – ५ हजार ७७६ रुपये 

नागपूरसाठी – 
इंडिगो – ७ हजार २६७ रुपये 

कोच्चीसाठी – 
इंडिगो – ९ हजार ११६ रुपये 
अकासा – ७ हजार ३७३ रुपये 

मुंबई विमानतळावरुन विमान भाडे – २६ डिसेंबरसाठी 
दिल्लीसाठी – 
इंडिगो – ६ हजार ११६ रुपये 
अकासा – ५ हजार ७७६ रुपये 

नागपूरसाठी – 
इंडिगो – ५ हजार ७४४ रुपये 

कोच्चीसाठी – 
इंडिगो – १५ हजार ४३४ रुपये 
अकासा – २४ हजार १६० रुपये

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *