Headlines

Navi Mumbai Airport Naming | दिबा पाटलांच्या नावाबाबत शंका, विमानतळाच्या भिंतीवर उल्लेख नाही!

Navi Mumbai Airport Naming | दिबा पाटलांच्या नावाबाबत शंका, विमानतळाच्या भिंतीवर उल्लेख नाही!
Navi Mumbai Airport Naming | दिबा पाटलांच्या नावाबाबत शंका, विमानतळाच्या भिंतीवर उल्लेख नाही!


नवी मुंबई विमानतळाला दिवंगत नेते दिबा पाटलांचे नाव देण्याबाबत आता शंका उपस्थित झाली आहे. विमानतळाच्या कंपाऊंड वॉलवर ‘सिडको’ आणि ‘एनएमआयएएल’ (Navi Mumbai International Airport Limited) असा उल्लेख आहे. तसेच, पनवेलमधील महापालिकेच्या दिशादर्शक फलकांवरही ‘नवी मुंबई विमानतळ’ असेच नमूद आहे. यामुळे दिबा पाटलांचे नाव दिले जाणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत प्रकल्पग्रस्त नेते दिबा पाटील यांचे नाव द्यावे, अशी जोरदार मागणी यापूर्वी झाली होती. स्थानिक आमदार आणि लोकांनी यासाठी मोठा उठाव केला होता. राज्य सरकारने ही मागणी मान्य करून तसा ठराव केंद्र सरकारला पाठवला होता. मात्र, अनेक महिने झाले तरी केंद्र सरकारने यावर कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. पुढील दीड-दोन महिन्यांत हे विमानतळ सुरू होणार आहे. शासकीय यंत्रणेने सर्व ठिकाणी ‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असा उल्लेख केल्याने नामकरणाबाबतचा वाद वाढला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *