नवी मुंबई शहरातील १५० अनधिकृत होर्डिंगवर रात्रंदिवस कारवाई सुरु राहणार असल्याने होर्डिंग मालकांचे धाबे दणाणले……
नवी मुंबई महानगर पालिकेचे डॅशिंग अतिक्रमण उप आयुक्त राहुल गेटे यांच्या आदेशानुसार आणि सहाय्यक आयुक्त, विभाग नेरुळ व घणसोली यांच्या अधिपत्याखाली अतिक्रमण विभागाचे अधिकारी/ कर्मचाऱ्यांमार्फत प्लॉट नंबर43 सेक्टर 1 शिरवणे नेरुळ व महापे रबाळे येथील अनधिकृत होर्डिंग काढण्याचे काम सुरु झाले तर नवी मुंबई महानगर पालिकेच्या हद्दीत कोणत्याही ठिकाणी अनधिकृत होर्डिंग दिसणार नसल्याचे उप आयुक्त यांनी सांगितले……
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर आता नवी मुंबई महापालिका ऍक्टिव्ह झाली असून शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंगवर धडक कारवाई करण्यात आली…