नवी मुंबई महापालिका आयुक्तांची भेट घेऊन कामगारांनाच्या समस्या संदर्भात चर्चा केली……

                     Today on 23/05/2020 under the leadership of Hon’ble MLA Shashikant Shinde Saheb, General Secretary Vitthal Gole Saheb, Deputy Chairman Nitin Chavan Saheb met the Municipal Commissioner and discussed the problems of the workers.
                      Navi Mumbai Municipal Corporation contract workers as per the notification dated 24/02/2015 of the Department of Industry, Energy and Labor of the State Government. Salary is being paid.
                     

          परंतु महापालिकेतील काही विभागाने कोणत्याही शासन निर्णयाचा अभ्यास न करता आपल्या मनाला वाटेल त्या पद्धतीने कामगारांना चुकीची वर्गवारी केली आहे.कारण महाराष्ट्र शासन च्या उद्योग,उर्जा व कामगार विभागाच्या व श्रम आणि रोजगार मंत्रालय नवी दिल्ली १९/०१/२०१७ च्या अधिसुनेनुसार नळ कारागीर,वीजतंत्री, जोडारी,पंप चालक,पर्यवेक्षक ,तारतंत्री,वाहनचालक,मीटर वाचक हि पदे कुशल व माळी कामगार,मलेरिया कामगार,सफाई कामगार हि पदे अर्धकुशल या वर्गवारी मध्ये असताना संबधित विभागाने कोणतीही पडताळणी न करता व शासन आदेश न पाहता यांना अर्धकुशल व अकुशल या वर्गवारी मध्ये टाकण्यात आले आहे. यामुळे कामगारांचे प्रती महा येणाऱ्या पगारात २ ते ३ हजार नुकसान झाले आहे हा कामगारावर खूप मोठा अन्याय आहे.
                    येणाऱ्या दिवसात समान काम समान वेतन लागू झाले तर त्यांच्या लावण्यात आलेल्या चुकीच्या वर्गवारी मुळे त्यांच्या वाढीव पगारावर परिणाम होऊ नये म्हणून त्यांना शासन निर्णयानुसार कुशल या वर्गवारी मध्ये विभागण्यात यावे.

                          समान काम समान वेतन संदर्भात चर्चा केली असता आयुक्तांनी सांगितले की सदर अहवाल मध्ये काही त्रुटी असल्या कारणामुळे सदर अहवाल सादर करण्यास विलंब झाला आहे पण येत्या काही दिवसात अहवाल सादर करू असे सांगितले.
                          सदर मिटिंग मध्ये नवी मुंबई अध्यक्ष संजय सुतार, सरचिटणीस चंद्रकात चिकणे, उपाध्यक्ष बाळकृष्ण कदम,नितीन बांगर खजिनदर विजय बागडे, सदस्य गणेश भंडारी,विशाल येशरे व इतर कामगार प्रतिनिधि उपस्थित होते.
संजय सुतार
अध्यक्ष,
राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन नवी मुंबई

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *