नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे ऍक्शन मोड मध्ये मुख्यालयामधील विविध कार्यालयांची पाहणी केली.

नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे ऍक्शन मोड मध्ये मुख्यालयामधील विविध कार्यालयांची पाहणी केली.

महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी मुख्यालयामधील कार्यालयांची पाहणी केली. ठिक ठिकाणी पडलेले फाईलचे ढीग पाहून नाराजी व्यक्त केली. स्वच्छते बरोबर नीटनेटकेपणाला प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या. प्रत्येक कर्मचाऱ्यांकडे जॉब चार्ट असावे अशा सूचना केल्या.पुढील आठवड्यात पुन्हा पाहणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. महानगरपालिका आयुक्तांनी बैठकांसह प्रत्यक्ष  कामाच्या ठिकाणी स्थळपाहणीचा सपाटा लावला आहे. रुग्णालय,शाळांना भेटी दिल्यानंतर  महानगरपालिका क्षेत्रातील विभाग  कार्यालयांची पाहणी करणार असल्याचे सांगण्यात आले.

कार्यालयांमध्ये ठिकठिकाणी  पडलेले फायलींचे ढीग पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली. फाईल ठेवण्याच्या पद्धतीमध्ये बदल करण्याच्या सूचनाही त्यांना केल्या. स्वच्छतेला प्राधान्य देण्यात यावे, अशा सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या असून पुढील आठवड्यात पुन्हा पाहणी करणार असल्याचा इशाराही दिला आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याकडे त्याच्याकडील जबाबदारीचे स्वरूप लिखि स्वरूपात असणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्याकडे जॉब चार्ट असलेच पाहिजे. अशा सूचना दिल्या.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *