Headlines

राष्ट्रवादी कामगार संघटनेचा महापालिका आयुक्त यांना कामगारांचे विषय 7 दिवसात मार्गी नाही लागले तर आंदोलनाचा इशारा…

                               आज दिनांक 29/09/2022 रोजी मा. आमदार, कामगार नेते शशिकांत शिंदेसाहेब, सरचिटणीस विठ्ठल गोळे साहेब, उपाध्यक्ष नितीन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली व नवी मुंबई अध्यक्ष संजय सुतार, सरचिटणीस चंद्रकांत चिकणे, उपाध्यक्ष अजय सुपेकर, बाळकृष्ण कदम, नितीन बांगर व कामगार प्रतिनिधी यांच्या उपस्थित नवी मुंबई महापालिका आयुक्त यांच्याशी कामगारांच्या प्रलंबित विषयाबाबत पत्रव्यवहार करून लवकरात लवकर सोडीविण्याच्या सूचना दिल्या.

विषय खालील प्रमाणे…..

                        १) दिनांक १९ सप्टेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाने स्थानिक स्वराज्य संस्था मधील अधिकारी/कर्मचारी (सफाई कर्मचारी/कंत्राटी/मानधन तत्वावरील) यांच्या साठी कोविड विरोधी मोहिमेमध्ये कर्तव्य पार पाडताना कोरोनाची लागण होऊन मुर्त्युमुखी पडलेल्या कर्मचारी यांना केंद्र शासन व राज्य शासनाच्या धर्तीवर रुपये ५० लाख सानुग्रह सहाय्यक अनुदान वितरीत करण्यासंधर्भात सर्व महापालिकांना शासन निर्णय पारित केला आहे.तरी आयुक्त महोदय यांनी सदर निर्णयाची अंमलबजावणी करून मयत कामगारच्या कुटुंबाना सदर रक्कम मिळण्यासाठी लवकरात लवकर कार्यवाही करून सदर कुटुंबाना न्याय मिळवून द्यावा.

                          2) सन्मा.आमदार शशिकांत शिंदे साहेब यांनी प्रथम समान काम समान वेतनची मागणी दि.१३/०२/२०२१ रोजी मा.आयुक्त यांच्याकडे केली व दि.०७/०४/२०२१ रोजी त्यांच्या व महापालिका आयुक्त उपस्थितीत नगर विकास विभाग मंत्रालय येथे बैठक आयोजित करून समान काम समान वेतन चा प्रस्थाव ‘पदनामानुसार’ सादर करण्याच्या लेखी सुचना दिल्या होत्या.त्या अनुशंघाने आपण दि.२७/०५/२०२२ रोजी सदर प्रस्थाव नगर विकास विभागाला सादर केला परंतु सदर प्रस्थाव सादर करते वेळी आपल्याकडून सदर प्रस्थाव मध्ये अनेक त्रुटी(वर्गवारी व वेतनश्रेणी संधर्भात ) निदर्शनास येतात.सदर त्रुटीमुळे कामगारांचे खूप मोठे नुकसान होणार आहे.आपणांस विनंती करतो कि सदर त्रुटी संधर्भात नगर विभागाचे प्रधान सचिव यांच्या सोबत बैठक घेऊन संबधित त्रुटीची(वर्गवारी व वेतनश्रेणी संधर्भात ) सुधारणा करून लवकरात लवकर प्रस्थावास मंजुरी देण्यासंधार्भात चर्चा करावी.

                           3) दिनांक २३/०५/२०२२ रोजी शहर अभियंता विभागातील काही तांत्रिक पदांना (नळ कारागीर,वायरमन, पर्यवेक्षक, जोडारी,मीटर रीडर,वाहनचालक,पंप चालक व इतर काही ) महाराष्ट्र शासनाच्या उद्योग उर्जा व कामगार विभागाच्या निर्णयानुसार हि पदे कुशल वर्गवारी मध्ये समाविष्ट करण्या संबधि मा.आयुक्त महोदय आपणास पत्रव्यवहार केला होता आणि मा उप्पायुक्त (प्रशासन) यांनीही संबधित विभागांना यासंबधी कार्यवाही करण्याचे लेखी आदेश दिले होते.परंतु संबधित विभागाने आजतागायत सदर विषयाची दखल घेतली नाही.फक्त विषयाला बगल देण्याचे काम चालू आहे.येणाऱ्या दिवसात समान काम समान वेतन लागू झाले तर सदर चुकीच्या वर्गवारीने कामगारांच्या पगारात तफावत दिसेल.आपण संबधित विभागाला या संधर्भात लेखी सूचना द्याव्यात.

 

                       4) दिनांक ०८/०८/२०२२ रोजी उद्यान विभागातील कंत्राटी कामगारांच्या विविध समस्या (वेळेवर वेतन मिळणे, ESIC कार्ड,वार्षिक ८ दिवशीय भरपगारी रजा,गणवेश, ओळख पत्र,वाढीव महगाई भत्ता अशा इतर समस्या) संधर्भात भेट घेतली होती.परंतु अद्याप सदर विभागाकडून कोणतीही कारवाही होताना दिसत नाही.म्हणून आपणास विनंती आहे कि कामगाराच्या समस्या मार्गी लागत नाही तो पर्यत ठेकेदाराला कोणतीही दयेके अदा करू नये व संबधित विभागातील अधिकार्यास याबाबत सूचना द्याव्यात.

                सतत संबधित विषया संधर्भात पत्रव्यवहार करून हि संबधित अधिकारी व ठेकेदारांना सदर विषयाचे गांभीर्य दिसत नाही.त्यामुळे राष्ट्रवादी युनियन ने मांगण्या येत्या 7 दिवसात मार्गी नाही लावल्या तर अंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *