Headlines

NEET UG 2026: 12 वी मॅथ्स घेणारेही मेडिकलला प्रवेश घेऊ शकणार, केवळ ही परीक्षा द्यावी लागणार

NEET UG 2026: 12 वी मॅथ्स घेणारेही मेडिकलला प्रवेश घेऊ शकणार, केवळ ही परीक्षा द्यावी लागणार
NEET UG 2026: 12 वी मॅथ्स घेणारेही मेडिकलला प्रवेश घेऊ शकणार, केवळ ही परीक्षा द्यावी लागणार


NEET UG 2026: वैद्यकीय शिक्षण म्हणजे १२ वी बायोलॉजी घेणारे विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळतो आणि ते डॉक्टर बनू शकतो. परंतू आता सरकारने या धोरणात बदल केला आहे. नॅशनल मेडिकल कमिशनने (NMC) मेडिकल प्रवेश नियमात थोडा बदल केला आहे. आता १२ वी मध्ये PCM घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील अतिरिक्त विषय म्हणून बायोलॉजी पास करुन NEET-UG परीक्षा देऊ शकतात.

आता १२ वीत बायोलॉजी विषय न घेताही डॉक्टर होण्याची संधी मिळणार आहे. नॅशनल मेडिकल कमिशनने (NMC) नियमात बदल केला आहे. NMC ने पात्रता नियमात मोठा बदल करत PCM स्ट्रीममधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील मेडिकल क्षेत्रात येण्याची संधी दिली आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याने १२ वीत मॅथ्स घेतले तर तो अतिरिक्त विषय म्हणून बायोलॉजी पास करुन मेडिकल प्रवेश परीक्षा देऊ शकतात. या निर्णयाने लाखो विद्यार्थ्यांना डॉक्टर होण्याचा मार्ग उघड झाला आहे.

काय आहे नवा बदल?

आधीच्या नियमानुसार मेडिकल प्रवेश परीक्षेसाठी ११ वी आणि १२ वी मध्ये बायोलॉजी मुख्य विषय घेऊन अभ्यास करण्याची गरज असायची. NMC ने आता ही अट काढली आहे. आता कोणत्याही विद्यार्थ्याने १२ वी फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स (PCM) मधून अभ्यास केला असेल तर तो कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून बायलॉजी वा बायोटेक्नॉलॉजी विषयला एडिशन सब्जेक्ट रुपात पास केली असेल तर तो नीट परीक्षा देऊ शकतो. परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी भारत वा परदेशात मेडिकल कॉलेजात MBBS आणि BDS सारखा कोर्समध्ये प्रवेश करु शकतो.

स्ट्रीम बदलण्याचे स्वातंत्र्य

हा निर्णय त्या विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा असणार आहे. ज्यांनी दहावी नंतर घाईघाईत किंवा दबावामुळे PCM घेतले असेल, नंतर १२ वी नंतर त्याला वैद्यकीय क्षेत्रात करीयर करायचे असेल तर तो करु शकणार आहे. आधी स्ट्रीम बदलण्यासाठी पुन्हा ११ वी – १२ वी पुन्हा बायोलॉजी करावी लागायची. ज्यामुळे वेळ आणि वर्षे दोन्ही वाया जात होते. आता केवळ एका विषयाची परीक्षा देऊन मेडिकलचा मार्ग मोकळा होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग आणि मेडिकल दोन्ही पर्याय खुले राहू शकतात.

वयोमर्यादा आणि आवश्यक गुण

  • मेडिकल प्रवेशासाठी काही अटी देखील लागू
  • किमान वय : प्रवेश वर्षाच्या ३१ डिसेंबरपर्यंत १७ वर्षे पूर्ण व्हायला हवेत. कमाल वय सध्या निश्चित केलेले नाही.
  • गुणांची अट : सामान्य वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी १२ वीत PCB विषयात किमान ५० % गुण मिळणे गरजेचे
  • आरक्षित वर्गाला सूट : OBC, SC आणि ST वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी ४० % गुण आवश्यक आहेत, तर दिव्यांग श्रेणीसाठी ४५% गुण आवश्यक आहेत.
  • जर बायोलॉजी अतिरिक्त विषय म्हणून घेतली असेल तर त्याचे गुणही पात्रेतत जोडले जातील.
  • या बदलाने मेडिकल शिक्षणात लवचिकपणा येतो आणि आता डॉक्टर बनण्याचे स्वप्न पहिल्याहून जास्त विद्यार्थ्यांसाठी शक्य झाले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *