Headlines

New GST Rates: केंद्र सरकारकडून दिवाळी धमाका; TV, AC, कपडे, खाद्यपदार्थ स्वस्त, कोणत्या वस्तूंवर शून्य टक्के जीएसटी?, संपूर्ण यादी!

New GST Rates: केंद्र सरकारकडून दिवाळी धमाका; TV, AC, कपडे, खाद्यपदार्थ स्वस्त, कोणत्या वस्तूंवर शून्य टक्के जीएसटी?, संपूर्ण यादी!
New GST Rates: केंद्र सरकारकडून दिवाळी धमाका; TV, AC, कपडे, खाद्यपदार्थ स्वस्त, कोणत्या वस्तूंवर शून्य टक्के जीएसटी?, संपूर्ण यादी!


New GST Rates: सणासुदीच्या काळात, दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारने सर्वसामान्यांना आणि व्यापाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. आधी असलेल्या जीएसटीच्या (New GST Rate) चार स्लॅबपैकी 12 टक्के आणि 28 टक्क्यांचा स्लॅब रद्द करण्यात आला. त्यामुळे देशात आता फक्त 5 टक्के आणि 18 टक्के असेल दोनच जीएसटी स्लॅब (GST Council Meeting) असतील. सरकारच्या या निर्णयामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू, खाद्यपदार्थ, साबण, कपडे, पादत्राणे यासह रोजच्या वापराच्या गोष्टी स्वस्त होणार आहेत. तर आरोग्य विमा आणि जीवन विम्यात पूर्ण सूट मिळण्याची शक्यता आहेत. सरकारचा हा निर्णय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहे.

नवी दिल्लीत जीएसटी कौन्सिलची महत्त्वाची बैठक पार पडली. त्यामध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आला. स्वातंत्र्यदिनीच्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटीमध्ये बदल होणार असे सांगितले होते. त्यावर आता बैठकीत निर्णय झाला देशात लागू असलेल्या 12 टक्के आणि 28 टक्क्यांचा स्लॅब रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे ज्या गोष्टींवर आधी 28 टक्के जीएसटी लागायचा त्यावर आता 18 टक्के जीएसटी लागणार आहे. त्याचबरोबर ज्या गोष्टींवर आधी 12 टक्के जीएसटी लागायचा, त्यावर आता पाच टक्के जीएसटी लागणार आहे. तर काही वस्तूंवरील जीएसटी हा शून्य टक्के करण्यात आला आहे.

खा,प्या, मजा करा, पुढील वस्तूंवर शून्य टक्के जीएसटी-

1. आरोग्य विमा
2. पनीर
3. पराठा, 
4. परोटा,
5. खाकरा, 
6. चपाती, 
7. तंदूर रोटी
8. दूध
9. पिझ्झा 
10. 33 जीवनरक्षक औषधे
11. गंभीर आणि दुर्मिळ आजारांवरची औषधं
12. पेन्सिल,
13. शार्पनर,
14. क्रेयॉन्स
15. खोडरबर
16. वह्या
17. नकाशे,
18. चार्ट,
19. ग्लोब 

पुढील वस्तूंवर 5 टक्के जीएसटी-

1. इलेक्ट्रीक गाड्या
2. केसांचे तेल, 
3. शाम्पू
4. टूथपेस्ट, 
5. टूथ ब्रश
6. साबण,
7. दाढीचे साबण
8. बटर,
9.तूप,
10. चीज
11. पाकिटातले नमकीन,
12. भुजिया,
13. मिक्श्चर
14. बाळाची दुधाची बाटली,
15. डायपर,
16. नॅपकिन्स
17. शिलाई मशिन आणि तिचे सुटे भाग
18. थर्मोमीटर
19. ग्लुकोमीटर आणि टेस्ट स्ट्रीप्स
20. चष्मे
21. रोगनिदानाची उपकरणे
22. ट्रॅक्टर, 
23. ट्रॅक्टरचे टायर्स, 
24. सुटे भाग
25. जलसिंचन,
26. तुषारसिंचनाची उपकरणे
27. कृषी उपकरणे, 
28. कृषी फवारणी औषधे

संबंधित बातमी:

GST : मोठा निर्णय! आता फक्त 5 आणि 18 टक्के असे दोनच कर; घरे, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि कपड्यांसह काय स्वस्त होणार?

आणखी वाचा





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *