
Nishikant Dubey On Raj Thackeray: मनसेप्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतल्यानंतर भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंना आव्हान दिलं होतं. आपल्या घरात कोणीही सिंह असतो. तुमच्यात हिंमत असेल तर बिहार, तामिळनाडू, उत्तरप्रदेशात या, तुम्हाला दाखवून देऊ…महाराष्ट्र बाहेर या, तुम्हाला आपटून आपटून मारु, असं निशिकांत दुबे म्हणाले होते. निशिकांत दुबेंच्या या विधानावरुन राज ठाकरेंनी देखील प्रतिआव्हान दिलं आहे.
दुबे नावाचा कोणीतरी भारतीय जनता पक्षाचा खासदार म्हणाला, मराठी लोकांना आम्ही पटकून पटकून मारु…त्याच्यावर केस झाली का? हिंदी चॅनेल वाल्यांनी त्याचं चालवलं का? त्याचं वक्तव्य दाखवलं का? काहीही नाही. बघा हे कसे असतात. तू आम्हाला पटक पटकके मारणार? दुबेला मी सांगतो…दुबे..तुम मुंबई में आ जावो…मुंबई के समंदर में डुबे डुबे कर मारेंगे…, असं म्हणत राज ठाकरे यांनी भाजप खासदार निशिकांत दुबे यांना प्रत्युत्तर दिलं. काल (18 जुलै) झालेल्या मीरारोडमधील सभेत राज ठाकरे बोलत होते. आता पुन्हा एक्सवर पोस्ट करत निशिकांत दुबेंनी राज ठाकरेंना डिवचलं आहे.
राज ठाकरे म्हणाले डुबे डुबे कर मारेंगे, आता निशिकांत दुबेंचं ट्विट-
भाजपचा खासदार दुबे म्हणाला मराठी माणसांना आम्ही आपटून मारणार. त्याच्यावर केस नाही झाली, कुठेही हिंदी चॅनल्सवर बातम्या नाही झाल्या. त्याने मुंबईत येऊन दाखवावे, मग कळेल कोण कुणाला कसा मारतो. इकडे ये तुला इथल्या समुद्रात डुबे डुबे कर मारेंगे…., असं राज ठाकरे म्हणाले. आता निशिकांत दुबे यांनी एक्सवर पोस्ट करत मी राज ठाकरेंना हिंदी शिकवली?, असं म्हणत एएनआयचा व्हिडीओ शेअर केला आहे.
मैंने राज ठाकरे को हिंदी सिखा दी ? https://t.co/5YpM1SrzDt
— Dr Nishikant Dubey (@nishikant_dubey) July 18, 2025
कुणी माज घेऊन आला तर ठेचायचाच- राज ठाकरे
हिंदुत्वाच्या आडून तुम्ही मराठी संपवायला येणार असाल तर माझ्यासारखा कडवट मराठी तुम्हाला सापडणार नाही.हे हिंदवी स्वराज्य व्हावे असे छत्रपती शिवाजी महाराजांचे वाक्य होते, हिंदूवी नव्हे, हिंदवी. या हिंद प्रांतावर सव्वाशे वर्षे राज्य केलेला हा महाराष्ट्र आहे. इथे आमच्यावर बाहेरच्यांनी येऊन राज्य नाही करायचं. मराठी माणूस या ठिकाणचा मालक आहे. इथे व्यवसायाला आलेल्या लोकांनी गुण्यागोविंदाने राहावे, माज करू नये, आम्ही तुमच्याशी मराठीतच बोलू. मराठी माणसाला स्वतःहून काही करायची गरज नाही, कुणाच्या अंगावर जायची गरज नाही पण समोरचा कुणी माज घेऊन आला तर ठेचायचाच, असं राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरेंचं संपूर्ण भाषण, VIDEO:
संबंधित बातमी:
Raj Thackeray: …तर युती होणारच; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितले, मीरा रोडमधील सभेत काय म्हणाले?, VIDEO
आणखी वाचा