राष्ट्रवादी कामगार युनियनने कामगारांच्या विषयासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे मग तो विषय समान काम समान वेतन, कामगारांना कुशल वर्गवारी मध्ये समाविष्ट करणे, कोरोना कालावधी मध्ये काम करत असताना मयत कामगारांना विमा, कोरोना भत्ता व इतर अशा कामगारांच्या समस्या संधर्भात मा.आमदार शशिकांत शिंदे व विठ्ठल गोळे, नितीन चव्हाण, नवी मुंबई अध्यक्ष संजय सुतार,सरचिटणीस चंद्रकांत चिकणे,उपाध्यक्ष अजय सुपेकर,बाळकृष्ण कदम,नितीन बांगर,प्रशांत खोडदे यांच्या नेतृत्वाखाली हा विषय प्रथम मार्गी लावण्यासाठी युनियन महापालिका प्रशासन सोबत सतत पाठपुरावा केला आहे.
दिनांक 29/09/2022 रोजी मा आयुक्त यांची भेट घेऊन विविध विभागातील कामगारांच्या प्रलंबित विषया संधर्भात चर्चा केली. त्यानुसार आज सदर पत्राची दखल घेऊन मा. उपायुक्त यांनी सर्व विभागाना आम्ही केलेल्या मागण्या ची तातडीने अंमलबजावणी करण्या संधर्भात लेखी सूचना केल्या व तसें लेखी पत्र राष्ट्रवादी युनियन अध्यक्ष यांनाही ही दिले.
कोरोना कालावधी मध्ये कर्तव्य पार पाडत असताना मयत कामगारांना महाराष्ट्र शासन निर्णयानुसार 50 लाख रुपय अनुदान त्यांचा कटुंबाना लवकरात लवकर मिळावे.त्या संधर्भात कार्यवाही सुरु आहे.
उद्यान विभागातील कामगारांना वार्षिक 8 दिवशीय भर पगारी रजा, त्यांना वेळेवर वेतन, गणवेश, ओळख पत्र या सुविधा तातडीने देण्या संधर्भात कंत्राटदारस सूचना द्याव्यात.तसे पत्र विभागाकडून कंत्राटदारास देण्यात आले आहे.
शहर अभियंता विभातील टेक्निकल पदाना त्यांच्या अनुभवानुसार कुशल वर्गवारी मध्ये समाविष्ठ करण्या संधर्भात संबंधित अहवाल मागवून त्यावर लवकरात लवकर कार्यवाही करावी. (सदर मागणी नुसार शहर अभियंता विभागाने 1178 टेक्निकल पदाना कुशल वर्गवारी समाविष्ट करण्यासंधर्भात अहवाल सादर केला आहे तसे पत्र सोबत जोडले आहे).