
Mumbai : आर्थिक अडचणी आणि ओला उबेर कंपन्यांकडून वेळेवर पैसे न मिळाल्याने एका कॅब चालकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नालासोपाऱ्यात घडली आहे .सरोज सक्सेना (46)असे मृत चालकाचे नाव आहे .त्याने काल संध्याकाळी आपल्या राहत्या घरी विष पिऊन आपलं आयुष्य संपवलं .त्याच्या मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबाने त्याच्या आर्थिक स्थिती ठीक नसल्याचे सांगितलं . ओला उबर कंपन्या पैसे वेळेवर देत नसल्याने कॅब चालक मानसिक त्रासात होता .याच कारणामुळे त्यांनी आपले जीवन संपवल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे .
गेल्या तीन दिवसांपासून मुंबई सह महाराष्ट्रात ओला उबर ड्रायव्हर्स सध्या आंदोलन करत आहेत .यातच कॅब कंपन्या वेळेवर पैसे देत नसल्याच्या नैराश्यातून वाहन चालकाने आत्महत्या केल्याची गंभीर घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे .
नेमकं घडलं काय?
नालासोपाऱ्यात एका कॅब चालकाने आर्थिक अडचणी आणि कंपन्यांकडून वेळेवर पैसे न मिळाल्याच्या नैराश्यातून टोकाचे पाऊल उचललं आहे . सनोज सक्सेना (46) असे मृत कॅपचालकाचे नाव आहे .अनेक वर्षांपासून ते ओला उबेर साठी ड्रायव्हर म्हणून काम करत होते .त्यांच्या कुटुंबीयांनी आणि मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार मागील काही महिन्यांपासून त्याच्या आर्थिक स्थिती बिघडलेली होती .काम करूनही ॲप कंपन्यांकडून वेळेवर पैसे मिळत नसल्याने मानसिक तणावामुळे कॅब चालकाने विष पिऊन आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केलाय . मंगळवारी संध्याकाळी आपल्या राहत्या घरी विष पिऊन चालकाने आपलं आयुष्य संपवलं .यानंतर वसई विरार महानगरपालिकेच्या तुळींज रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं होतं .डॉक्टरांनी उपचार सुरू केले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला .
कॅबचालकांचे गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन
दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून मुंबई सह राज्यभरातील ओला उबेर चालक आंदोलन करत आहेत .त्यांनी आप कंपन्यांकडून कमी होणाऱ्या कमाई विरोधात आवाज उठवला असून काळी पिवळी टॅक्सी प्रमाणे त्यांनाही दर किलोमीटर मागे 32 रुपये भाडे द्यावे तसेच ॲप कंपन्या घेत असलेलं अधिकच कमिशन कमी करावे यासाठी राज्यभरातील कॅब चालक आंदोलन करत आहेत .
सिगारेट पेटवायला लायटर न दिल्यानं संताप अन्..
देवगड (devgad) तालुक्यातील वरेरी येथे सिगारेट पेटवण्यासाठी लायटर न दिल्याच्या किरकोळ कारणावरून एका 20 वर्षीय युवकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांच्या (Police) प्राथमिक तपासात ही माहिती समोर आली आहे. खून झालेल्या युवकाचे नाव कृष्णकुमार जुगराज यादव (20) असून तो मूळचा मध्यप्रदेशातील आहे. सद्यस्थितीत तो वरेरी, कुळये सडेवाडीनजीक असलेल्या चिरेखाणीवर राहत होता. या प्रकरणी पोलिसांनी त्याच परिसरात राहणाऱ्या रितीक दिनेश यादव (20) या संशयित आरोपीला अटक केली आहे.
हेही वाचा:
आणखी वाचा