त्याला आम्ही धडा शिकवणार, मारहाण झालेल्या तरुणीची भेट घेत मनसेचा इशारा; उपचाराची घेतली जबाबदारी
ठाणे : कल्याणमधील (Kalyan) रुग्णालयात कामावर असलेल्या रिसेप्शनीस्ट तरुणीला झालेल्या मारहाण प्रकरणातील आरोपी गोकूळ झा गुंड प्रवृत्तीचा तरुण आहे. फेरीवाल्यांकडून हप्ते गोळा करतो, हेच त्याचे काम असल्याची धक्कादायक माहिती शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख निलेश शिंदे यांनी दिली. तर, पीडित मुलींच्या उपचाराच्या खर्चाची जबाबदारी मनसेने घेतली आहे. उपचारासाठी पीडित मुलीला मनसे कार्यकर्त्यांनी रुग्णालयात दाखल केले…