भाजप नेते प्रविण दरेकर अडकले लिफ्टमध्ये, कार्यकर्त्यांनी दरवाजा फोडून केली सुटका, लिफ्टची क्षमता 10 जणांची पण चढले 17 जण
Pravin Darekar : महाराष्ट्र विधान परिषदेतील भाजपचे गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर हे आज वसईत तब्बल 10 मिनिटे लिफ्टमध्ये अडकले. वसई पश्चिमेतील कौल हेरिटेज सिटी येथील अपुलँड ग्रँड बॅन्क्वेट हॉलमध्ये जुन्या आणि जीर्ण इमारतींच्या स्वयंपुनर्विकासासाठी आयोजित मार्गदर्शन शिबिरासाठी दरेकर आले होते. या शिबिरासाठी आलेल्या अनेक मान्यवरांमध्ये दरेकर यांच्यासोबत वसईच्या आमदार स्नेहा दुबे-पंडीत आणि…