मिरा भाईंदरमधून राज ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा; भाषणानंतर भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) मिरा भाईंदरमधील भाषणाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. त्यासह, राजकीय वर्तुळातही राज त्यांच्या भाषणातून नेमकं काय बोलतील, मराठी-हिंदी वादावर त्यांची भूमिका काय असेल याकडे सर्वांच्या नजरा होत्या. अखेर, मीरा भाईंदर येथील सभेतून राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांनी त्रिभाषासूत्री महाराष्ट्रात लागू करणार असल्याचं…